सोनालीची हॅटट्रिक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 11:27 IST2016-11-21T15:54:15+5:302016-11-22T11:27:54+5:30

बॉलिवूड, मराठी चित्रपटांसह आता विविध प्रादेशिक भाषेतील चित्रपटदेखील प्रकाशझोतात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर या प्रादेशिक ...

Sonali hatatric! | सोनालीची हॅटट्रिक !

सोनालीची हॅटट्रिक !

लिवूड, मराठी चित्रपटांसह आता विविध प्रादेशिक भाषेतील चित्रपटदेखील प्रकाशझोतात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे रिमेकदेखील बनत असल्याचे मिळत आहेत. अशा या प्रादेशिक चित्रपटांमध्ये आपले प्रेक्षकांचे लाडके मराठी कलाकारदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा गुजराती चित्रपटांमध्ये एक, दोन नाही तर तब्बल तिसरी वेळ काम करण्याची. तिच्या या तिसºया चित्रपटाचे नाव हॉटेल झोडिक असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजू पटेल आहेत. या गुजराती चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सला सोनाली सांगते, हो, गुजराती चित्रपटांमध्ये हॅटट्रिक करत असल्यामुळे खूपच आनंद होत आहे. माझ्या पहिल्या गुजराती चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर चांगला गल्ला कमविला होता. तर दुसरा चित्रपटदेखील आॅस्करला पोहोचला होता. आणि आता हा माझा तिसरा गुजराती चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक, टेक्निकल व संपूर्ण टीमच चांगली असल्यामुळे प्रादेशिक भाषेत काम करते हे मला कधी जाणवलं नाही. त्यामुळे प्रादेशिक चित्रपट करताना मला भाषेचा अडसर हा कधीच निर्माण होत नाही. तसेच हे खूप आशादायक वाटते की, करिअरच्या कोणत्याही वळणावर अशा प्रकारची संधी मिळते. प्रादेशिक चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत म्हणून या चित्रपटात काम करत नाही. तर यापूर्वीदेखील मराठी, तमिळ, तेलगु अशा अनेक भाषांमध्ये काम केले आहे. त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच वेगवेगळया प्रादेशिक भाषेतील दिग्दर्शक जो माझ्यावर विश्वास टाकतात याचादेखील अधिक आनंद होत आहे. आता गुजराती चित्रपटानंतर कोणत्या भाषेत काम करण्यास मिळेल याचीदेखील उत्सुकता लागली आहे. 


 

Web Title: Sonali hatatric!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.