म्हणून हृतिक रोशनने 'हृदयांतर' सिनेमाचा ट्रेलर केला प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 10:49 IST2017-05-31T05:19:10+5:302017-05-31T10:49:10+5:30
बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनही पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे या सिनेमाची रसिकांमध्ये अधिक उत्सुकता आहे.

म्हणून हृतिक रोशनने 'हृदयांतर' सिनेमाचा ट्रेलर केला प्रदर्शित
' ;'सतत आनंदी राहण्यासाठी कधी कधी दुखावणं ही गरजेचं असतं'' अशी अनेक इमोशनल डॉयलॉग असलेला हृदयांतर हा बहुचर्चित सिनेमा 7 जुलैला रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनही पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे या सिनेमाची रसिकांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे. या सिनेमाचा नुकताच खुद्द हृतिक रोशनच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित होताच हृतिक रोशनची सिनेमातली भूमिका नेमकी काय आहे समजून घेण्यासाठी अनेकांनी हा ट्रेलर पाहिलाय. विक्रम फडणीसचे दिग्दर्शन आणि हृतिक रोशनचे मराठी सिनेमात पदार्पण या दोन गोष्टीशिवाय अनेक गोष्टी या ट्रेलरमधून कळतात. एक लहान मुलगी तिला एका आजाराने ग्रासलेले असते. तिची शेवटची इच्छा असते की तिला क्रिशला या सुपरहिरोला भेटायचे असते. क्रिशला भेटण्याची तिची इच्छाही पूर्ण होते. तो क्रिश साकारला आहे हृतिक रोशनने. विशेष म्हणजे तबब्ल नऊ वर्षानंतर मुक्ता बर्वे, सुबोध भावे ही जोडी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या ट्रेलरला रसिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय.सिनेमाची वेगवेगळ्या युक्तीचा वापर करत प्रमोशन करण्यात येतंय. खुद्द हृतिकही हा सिनेमा जास्तीत जास्त रसिकांपर्यत पोहचावा यासाठी मेहनत घेतोय.अगदी बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच जंगी प्रमोशन 'हृदयांतर' सिनेमाचे होत आहे. त्यामुळे सिनेमा पाहण्याची रसिकांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे. विक्रम फडणीस दिग्दर्शित‘हृदयांतर’ सिनेमा आधी 9 जूनला प्रदर्शित होणार होता मात्र काही कारणांमुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख 9 जुलै करण्यात आली. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाही रसिकांच्या काळजाला हात घालण्यास यशस्वी ठरेन अशा प्रतिक्रीयाही उमटत आहे.