स्मिता गोंदकर एन्जॉय ट्रीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 13:55 IST2016-12-24T13:55:31+5:302016-12-24T13:55:31+5:30
प्रत्येक कलाकार हा आपल्या बिझी शेडयुल्डमध्ये व्यग्र असतो. कॅमेरा, अॅक्शन, रिटेक अशा या चंदेरी दुनियात कलाकारांना स्वत:साठीदेखील वेळ नसतो. ...
.jpg)
स्मिता गोंदकर एन्जॉय ट्रीप
प रत्येक कलाकार हा आपल्या बिझी शेडयुल्डमध्ये व्यग्र असतो. कॅमेरा, अॅक्शन, रिटेक अशा या चंदेरी दुनियात कलाकारांना स्वत:साठीदेखील वेळ नसतो. मात्र आपल्या बिझी शेडयुल्डमधून थोडा वेळ मिळाला तर हे कलाकार आपल्या मित्रांसोबत सुंदर ट्रीपचे आयोजन करत असतात. अशीच मित्र मैत्रिणीसोबतची ट्रीप अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने एन्जॉ़य केलेली पाहायला मिळत आहे. कारण तिने नुकतेच सोशलमीडियावर शिमला ट्रीपचे झक्कास फोटो अपलोड केले आहेत. या निसर्गाच्या सुंदर वातावरणात ती मित्र मैत्रिणींसोबत धमाल करताना पाहायला मिळत आहे. तिच्या या ट्रिपविषयी स्मिता लोकमत सीएनएक्सला सांगते, शिमला येथे मी चित्रिकरणाच्या निमित्ताने पोहचले होते. चित्रिकरणातून थोडा वेळ मिळाल्याने शिमला या निसर्गाच्या सुंदर शहराचा आनंद लुटला आहे. तसेच शिमला या ठिकाणी माझ्या मैत्रिणीचे घर आहे. त्यामुळे आम्ही सर्व मित्र मैत्रिणींनी एकत्रित येऊन तिथे खूपच धमाल केली आहे. माझ्यासाठी ही अविस्मरणीय ट्रीप ठरली आहे. तसेच माझ्या नाटकाचे काही प्ऱयोग असल्याने मी लगेच परतले असल्याचेदेखील तिने यावेळी सांगितले. स्मिता गोंदकरने यापूर्वी पप्पी दे... पप्पी दे या गाण्यांतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच ती माझ्या नवºयाची बायको, हिप हिप हुर्रे, गडबड गोंधळ अशा अनेक चित्रपटांतून पाहायला मिळत आहे. तसेच ती मराठी इंडस्ट्रीचा तगडा कलाकार भरत जाधव याच्यासोबत रंगभूमीवर पाहायला मिळत आहे. सौजन्याची एैशीतेशी असे या नाटकाचे नाव आहे. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्याचप्रमाणे तिचा भय हा आगामी चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे.
![]()