सिध्दार्थचा राजस्थानी लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 13:15 IST2016-12-10T13:15:36+5:302016-12-10T13:15:36+5:30
प्रत्येकाला राजस्थानी, गुजराती, काश्मीरी, महाराष्ट्रीयन अशा विविध लूकची क्रेझ असते. आपण ही असा पेहराव करावा असे प्रत्येकाला वाटत असते. ...

सिध्दार्थचा राजस्थानी लूक
प रत्येकाला राजस्थानी, गुजराती, काश्मीरी, महाराष्ट्रीयन अशा विविध लूकची क्रेझ असते. आपण ही असा पेहराव करावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे भारतात कुठेही आपण पर्यनटाला गेलो तर त्या पेहरावात फोटो काढल्याशिवाय कुणी पुन्हा आपल्या घरी परतत नाही. असाच एक झक्कास पेहरावातील फोटो अभिनेता सिध्दार्थ चांदेकर याने काढला आहे. हो, सिध्दार्थने नुकताच राजस्थानी लूकमधील फोटो सोशलमीडियावर अपडेट केला आहे. त्याच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सिध्दार्थ सध्या राजस्थान शहराचे पर्यटन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सिध्दार्थ एकटाच पर्यटन करत नाही, तर त्याच्यासोबत अभिनेता हेमंत ढोमे, क्षिती ढोमे, आरती वडगबळकर अशा त्याच्या काही खास दोस्तांसोबत तो राजस्थानची भटकंती करताना पाहायला मिळत आहे. तसेच क्षितीने ही राजस्थानमधील काही खास फोटो सोशलमीडियावर अपडेट केले आहेत. या कलाकारांचे जीवन म्हणजे लाईट, कॅमेरा, रिटेक, अॅक्शन यामध्ये अडकलेले असते. त्यामुळे कुठेतरी तो निवांतपणा मिळावा यासाठी कलाकारांसाठी एक तो ट्रीप बनती है म्हणत या कलाकारांनी भटकंतीसाठी राजस्थान हे शहर निवडलेले दिसत आहे. सिध्दार्थचा नुकताच वजनदार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर अभिनेता हेमंत ढोमेचा बघतोस काय मुजरा कर हा चित्रपटदेखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अभिनेत्री क्षिती जोगदेखील तिच्या हिंदी मालिकेत सातत्याने व्यग्र असते. त्यामुळे या सर्वानी कलाकारांनी रोजच्या कामातून रिलीफ होऊन राजस्थानची ट्रीप एन्जॉय करायचे ठरविलेले दिसत आहे. त्यांचे हे सोशलमीडियावरील फोटो पाहता, त्यांची ही ट्रीप नक्कीच त्यांच्यासाठी अविस्मरणीय बनेल यात शंकाच नाही.