या चित्रपटात दिसणार सिदधार्थचा हटके लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 14:26 IST2017-01-28T09:43:59+5:302017-01-30T14:26:32+5:30
प्रत्येक कलाकारच त्याच्या चित्रपटामध्ये काही ना काही वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण एखादया चित्रपटातून हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर यावे ...
.jpg)
या चित्रपटात दिसणार सिदधार्थचा हटके लूक
प रत्येक कलाकारच त्याच्या चित्रपटामध्ये काही ना काही वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण एखादया चित्रपटातून हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर यावे असे प्रत्येकालाच वाटत असते. बॉलिवूडमध्ये जर आपण पाहीले तर आमीर खान कधीच आपल्याला एका ठराविक लूकमध्ये दिसत नाही. जसे आमीरचे चित्रपट वेगळे असतात तसाच त्याच्या सिनेमातील व्यकितरेखे प्रमाणेच त्याचा लुक देखील डिफरंट असतो. माणूस एक झाड या एका आगामी चित्रपटामध्ये आपल्याला अभिनेता सिदधार्थ जाधवचा असाच एक भन्नाट लूक पाहायला मिळणार आहे. सिदधार्थ या चित्रपटामध्ये प्रचंड केस आणि दाढी वाढवलेल्या वेषात दिसणार आहे. याआधी देखील सिदधार्थ अनेक चित्रपटांमध्ये वेगळ््या लूकमध्ये पाहायला मिळाला होता. तसेच त्याच्या गेला उडत या नाटकामध्ये देखील तो हटके अंदाजात दिसत आहे. आता या आगामी चित्रपटामध्ये सिदधार्थला त्याचे चाहते स्वीकारतील का हे तर आपल्याला लवकरच समजेल. या चित्रपटाचे दिग्दशर््न सुरेश झाडे यांनी केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये आपल्याला सिदधार्थ सोबत अभिनेत्री रुचिता जाधव पाहायला मिळणार आहे.
![]()