​सिद्धार्थ मेननने केले 37 तास चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 16:46 IST2017-04-06T11:16:47+5:302017-04-06T16:46:47+5:30

कलाकारांचे आयुष्य अतिशय धकाधकीचे असते असे म्हटले जाते ते चुकीचे ठरणार नाही. कलाकार दिवसातील अनेक तास हे चित्रीकरणाला देत ...

Siddharth Menon shot 37 hours | ​सिद्धार्थ मेननने केले 37 तास चित्रीकरण

​सिद्धार्थ मेननने केले 37 तास चित्रीकरण

ाकारांचे आयुष्य अतिशय धकाधकीचे असते असे म्हटले जाते ते चुकीचे ठरणार नाही. कलाकार दिवसातील अनेक तास हे चित्रीकरणाला देत असतात. एखाद्या मालिकेत काम करणारे कलाकार तर महिन्यातील कित्येक दिवस चित्रीकरण करतात. आराम हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नसतो असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. 
चित्रीकरण करत असताना कोणताही शॉर्ट एका टेकमध्ये ओके होत नाही. एका दृश्याला अनेक रिटेक घ्यावे लागतात. त्यामुळे एकच दृश्य अनेकवेळा करणे हेदेखील कलाकारासाठी आव्हानात्मक असते. पण त्यातदेखील कलाकार कंटाळा न करता आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देत असतात.
सिद्धार्थ मेननने खूप कमी काळात मराठी चित्रपटसृष्टीत चांगले नाव कमावले आहे. पोस्टर गर्ल, अँड जरा हटके, हॅपी जर्नी, पोपट यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. तो आता सध्या एका नव्या प्रोजेक्टवर काम करत असून यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. त्याने नुकतीच इन्टाग्रामवर एक पोस्ट टाकली असून या पोस्टवरून तो या चित्रीकरणात किती व्यग्र आहे हे दिसून येत आहे. त्याने त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत म्हटले आहे की, मी गेली 37 तास सतत काम करत आहे. या वेळात केवळ मला चार तास झोपायला मिळाले. तरीही मी अतिशय फ्रेश आहे. उद्या पुन्हा काम करण्यासाठी मला तितकाच उत्साह असून आज जगाला जागे होताना मी पाहिले आहे.
या पोस्टसोबत त्याने शूटलाइफ, अभिनेता आणि डे नाइट शिफ्ट असे टॅग दिले आहेत. त्याच्या या पोस्टला अनेक लाइक्स आणि कमेेंट्स मिळत आहेत.  



Web Title: Siddharth Menon shot 37 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.