शिक्षणाचा हक्क देणारी 'श्यामची शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:53 IST2016-01-16T01:09:31+5:302016-02-05T08:53:25+5:30

सध्या शालेय मुलांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत सरकार, पालक, शाळा आणि विद्यार्थ्यांमध्ये बरीच चर्चा आहे. या विषयावर आता एक चित्रपटच काय ...

Shyamchi school giving rights to education | शिक्षणाचा हक्क देणारी 'श्यामची शाळा'

शिक्षणाचा हक्क देणारी 'श्यामची शाळा'

्या शालेय मुलांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत सरकार, पालक, शाळा आणि विद्यार्थ्यांमध्ये बरीच चर्चा आहे. या विषयावर आता एक चित्रपटच काय तो यायचा बाकी आहे. प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. पण केवळ दप्तराच ओझचं नाही तर आजपर्यंत शाळा या विषयाशी निगडीत अनेक चित्रपट आले आहे. शाळा, शिक्षणाच्या आयचा घो, माझी शाळा, नाईट स्कूल, किल्ला हे त्यापैकीच काही.
असाच एक शाळेबद्दलचा विषय घेऊन येत आहेत दिग्दर्शक प्रकाश जाधव 'श्यामची शाळा' या चित्रपटातून. केवळ उच्चभ्रू घरातील मुलांनाच शिक्षण घेणे शक्य आहे का? मजुरांच्या मुलांना चांगले शिक्षण कधीच मिळू शकत नाही का, असा गंभीर प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो. मजूर म्हणून काम करणार्‍या लोकांचे विचार बदलण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे, निशा परूळेकर, अरुण नलावडे, विजय कदम महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

Web Title: Shyamchi school giving rights to education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.