/> वास्तववादी अभिनयाचे दर्शन पडद्यावर घडविणाºया अन प्रेक्षक अवाक होतील असा दर्जेदार अभिनय करणारे अभिनेते शशांक शेंडे आज त्यांच्या चित्रपटांमुळे घराघरात पोहचले आहेत. अनेक भुमिकांमध्ये गंभीर दिसणारे शशांक शेंडे जर एखाद्या आयटम साँग मध्ये ठुमके लावणार असे ऐकले तर आश्चर्य वाटेल ना. पण त्यांनी चक्क रेती या सिनेमामध्ये एका आयटम साँग वर लाजवाब डान्स केला असुन त्यांच्या या डान्सचे ठुमके सगळीकडेच गाजत आहेत. बघ,बघ, बघ ना रे ... काय बघशी, कुठे बघशी, किती बघशी असे बोल असलेल्या गाण्यावर शशांकने अप्रतिम डान्स केला आहे. त्यांच्या या पहिल्याच जान्स परफॉर्मन्स विषयी सीएनएक्सने शशांक शेंडे यांच्या सोबत खास बातचीत केली. यावेळी त्यांनी त्यांच्या अनुभवांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. ते म्हणाले, हे गाणे चित्रपटामध्ये एका सिच्युएशनमुळे आहे. उगाचच घ्यायचे म्हणुन घेतले नाही आणि माझ्या भुमिकेची गरज होती म्हणुन मला नाचायला लागले. माझ्या सीन प्रमाणे मला फक्त तिथे यायचे होते. डान्सर नाचत होते त्यांच्यामधुन एका माणसापर्यंत येऊन त्याच्याशी बोलुन पुन्हा जायचे एवढाच सीन होता. पण मला हे माहितच नव्हते कि मला देखील डान्स करायचा आहे. मी सीन पुर्ण केला अन जायला लागलो तेवढ्यात आमच्या कोरिओग्राफरने थांबवले व सांगितले तुम्हाला नाचायचे आहे, मग काय मी चांगलाच घाबरलो. सुरुवातीला दडपण आले परंतू जेव्हा त्यांनी सांगितले की तुम्हाला वाटेल तसे नाचा अगदी गणपती डान्स केला तरी चालेल मग जरा हायसे वाटले अन मी टेन्शन फ्रि झालो. त्या गाण्यामध्ये माझा जेवढा डान्स आहे तो मी अगदी मनाला वाटेल तसा केला आहे. याचे संपुर्ण क्रेडिट माझे कोरिओग्राफर आणि डायरेक्टर यांनाच जाते.
Web Title: Shashank Shendeen's thummes in the sand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.