ज्येष्ठ नागरिकांनी अंकुश चौधरीसह लुटला 'देवा' सिनेमाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 12:53 IST2017-12-28T07:23:36+5:302017-12-28T12:53:36+5:30

ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबातील तसेच समाजातील एक अनुभवसंपन्न घटक आहे. त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन आजच्या पिढीला, त्यांच्या आगामी वाटचालीसाठी ...

Senior citizens have enjoyed the troupe 'Deewan' with Ankush Chaudhary | ज्येष्ठ नागरिकांनी अंकुश चौधरीसह लुटला 'देवा' सिनेमाचा आनंद

ज्येष्ठ नागरिकांनी अंकुश चौधरीसह लुटला 'देवा' सिनेमाचा आनंद

येष्ठ नागरिक हे कुटुंबातील तसेच समाजातील एक अनुभवसंपन्न घटक आहे. त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन आजच्या पिढीला, त्यांच्या आगामी वाटचालीसाठी नेहमीच उपयोगी पडत असतात. म्हणूनच तर, त्यांच्या छत्रछायेखाली काही निवांत क्षण घालवण्यासाठी मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीने, ज्येष्ठ नागरिक संघ लक्ष्मी, चीरानगर ठाणे या वृद्धाश्रमातील काही ज्येष्ठ नागरिकांसोबत 'देवा' सिनेमाचा आस्वाद घेतला. इनोव्हेटीव्ह फिल्म्स आणि आणि प्रमोद फिल्म्सची  निर्मिती असलेल्या 'देवा' सिनेमातील अंकुशच्या अतरंगी व्यक्तिमत्वाची मज्जा ज्येष्ठांनी देखील पुरेपूर लुटली.
आयुष्याच्या उत्तरायणात आनंदी आणि स्वच्छंदी राहण्याच्या हेतूने हा सिनेमा खास ज्येष्ठांपर्यत पोहोचवण्यासाठी 'देवा' सिनेमाच्या टीमकडून हा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या सुखाचा विचार करणारा सिनेमातला हा 'देवा' केवळ चित्रपटापुरताच मर्यादित न राहता वास्तव्यातही या निमित्ताने समोर आला. मुरली नलप्पा दिग्दर्शित हा सिनेमा आयुष्याला नवी उमेद आणि आशावाद देत असल्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना 'देवा' सिनेमा दिशादर्शक ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील हा सिनेमा महत्वपूर्ण ठरत असून, त्यांच्या तणावरहित आणि निरोगी आयुष्यासाठी 'देवा' सिनेमातून संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. सिनेमा पाहिल्यानंतर या सर्वांनी आशीर्वादाबरोबरच, देवा सिनेमातील कामगिरीबद्दल अंकुशचे भरभरून कौतुकदेखील केले. अंकुशनेसुद्धा या सर्वांना नववर्षाचे शुभेच्छा देत, आभार मानले. 
देवा या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा अंकुश पाहायला मिळत आहे. रंगीत सदरा, फॅन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची मॉडर्न स्टाईल असा या चित्रपटातील अंकुशचा लूक प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या लूकप्रमाणेच या चित्रपटातील त्याची भूमिकादेखील काहीशी हटके असून ती देखील प्रेक्षकांना भावली आहे. या चित्रपटात तो प्रत्येकाला मदत करण्यास तत्पर असणाऱ्या एका व्यक्तिची भूमिका साकारत आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव देवा असून तो सगळ्यांचा लाडका दाखवला गेला आहे. केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनी देखील अंकुशच्या या चित्रपटातील अभिनयाची प्रशंसा केली होती.

Also Read : ​स्टनिंग लूक अविस्मरणीय ठरेल !

Web Title: Senior citizens have enjoyed the troupe 'Deewan' with Ankush Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.