निवडक चित्रपट ग्रामीण भागांपर्यत पोहचतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 12:33 IST2016-04-08T19:33:15+5:302016-04-08T12:33:15+5:30
तरूणींचा लाडका हॅण्डसम बॉय भूषण प्रधान हा पिंजरा या मराठी मालिकेतून महाराष्ट्रच्या घराघरात पोहोचला. त्यावेळी कित्येक तरूणी या नवीन ...

निवडक चित्रपट ग्रामीण भागांपर्यत पोहचतात
त ूणींचा लाडका हॅण्डसम बॉय भूषण प्रधान हा पिंजरा या मराठी मालिकेतून महाराष्ट्रच्या घराघरात पोहोचला. त्यावेळी कित्येक तरूणी या नवीन अभिनेत्याच्या सौदर्यावर फिदा झाल्या होत्या. तरूणींच्या कंठातील ताईत बांधलेल्या या अभिनेत्याने पिंजरानंतर घे भरारी, कुंकू, ओळख, चारचौघी अशा अनेक मालिका छोटया पडदयावर गाजविल्या आहेत. तसेच मालिके नंतर हळूहळू या अभिनेत्याने आपला यशस्वी प्रवास चित्रपटाच्या दिशेने वळविला. यानंतर भूषणने मागे वळूनच पाहिले नाही. सतरंगी रे, मिस मॅच, टाइम पास, टाइम पास २, कॉफी आणि बरचं काही असे एकसे एक तगडे चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहे. तर काही चित्रपट यंदा देखील प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. अशा या हॅण्डसम हंक अभिनेता भूषण प्रधानचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला सेलेब्रिटी रिपोटर्र.
![]()
कटयार काळजात घुसली, नटसम्राट, लय भारी, दुनियादारी अशा एक से एक सुपरहिट चित्रपट पाहता मराठी इंडस्ट्री भरारी घेत आहे हे नक्की. सध्या तितक्या ताकदीचे चित्रपटदेखील बनत आहे. पण हे सिलेक्टेड चित्रपटच मुंबई पुणे शहरासहित ग्रामीण भागातील प्रेक्षकांपर्यत पोहचतात. या चित्रपटांनादेखील कमी स्क्रीन मिळतात. त्यामुळे मराठी चित्रपटाला देखील प्रेक्षकवर्ग कमी मिळत असल्याचे दिसते. यासाठी ग्रामीण भागात देखील मराठी थिएटरची संख्या वाढविणे आवश्यक आहे. तसेच तिकीटाचे दर देखील सामान्य नागरिकांना परवडेल असे ठेवले गेले पाहिजे. सोमवार ते शुक्रवार हा पूर्ण आठवडा चित्रपट दाखविला गेला पाहिजे. जर शक्यच नसेल तर ग्रामीण भागात मराठी चित्रपट हा तंबूपर्यत तरी पोहोचला गेला पाहिजे.
मराठी इंडस्ट्रीत सध्या सामाजिक, क्लासिकल, मनोरंजक असे अनेक चित्रपट येत आहेत. पण मराठी प्रेक्षक हा क्लास- मास मध्ये न अडकता, सर्वच चित्रपटांना पसंती देत असल्याचे दिसत आहे. कटयार काळजात घुसली या क्लासिकल चित्रपटाप्रमाणेच ग्रामीण भागातील सामाजिक जीवनावर आधारित असलेला फॅन्ड्री चित्रपट तर मनोरंजक असा टाइमपास या चित्रपटांना देखील मराठी प्रेक्षकांनी कुठल्याही विभागात न अडकता भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसते. सगळया पद्धतीचे चित्रपट मराठी इंड्रस्टी साकारत आहे. पण थिएटर प्रेक्षकांच्या वेळेनुसार उपलब्ध नसेल तरी प्रेक्षक थिटरसच्या वेळेनुसार वेळ काढून चित्रपट पाहातात. आशा या आपल्या रसिक मायबाप प्रेक्षकांची अजून ही साथ असल्यामुळे आपली इंडस्ट्री उंचावर पोहोचली असल्याचे दिसत आहे.
चित्रपटाच्या एकाच दिवशी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होण्याविषयी विचारल तर, बॉलीवुडमध्ये देखील सध्या हेच चित्र दिसत आहे. बॉलीवुड चित्रपटनगरीत चार ते पाच चित्रपटांपैकी बिग बजेट, तगडे स्टारकास्टसिहत सशक्त कहाणी असणारे एक ते दोनच चित्रपट बॉक्सआॅफीसवर यश मिळवितात. तर बाकीचे चित्रपट अयशस्वी ठरतात. नेमके हेच चित्र मराठी इंडस्ट्रीत देखील दिसते. त्यामुळे हे चित्र कुठेतरी बदलणे आवश्यक असल्याचे वाटते. आणि यावर काही तरी उपाय नक्कीच निघू ही शकतो कारण आपल्याकडे तेवढी हुशार मंडळी देखील आहेत.
![]()
प्रमोशनची क्रेझ पाहता,चित्रपटातील कलाकार प्रत्येक वेळी सर्व ठिकाणी जाऊन प्रेक्षकांना भेटणे आवश्यक नाही. कारण कलाकारच प्रेक्षकांना जाऊन स्वत: भेटले तर ते थिएटरर्समध्ये येवून काय पाहणार. कलाकारांना पाहण्याची जी उत्सुकता असते ती तशीच ठेवली गेली पाहिजे. प्रमोशन हे वृत्तपत्रे, टीव्ही, सोशल वेबसाइटच्या माध्यमातूनदेखील होवू शकते. टीव्ही हा आता ग्रामीण भागातील घराघरात देखील पोहोचला आहे. त्यामुळे कलाकारांनी जाण्यायेण्यात खर्च न करता तो टीव्हीच्या प्रमोशन जाहिरातींवर अधिक केला तर तो नक्कीच खेडयापाडयात देखील पोहचेल व प्रेक्षकदेखील आवुर्जन थिएटरर्स किवा तंबूपर्यत येऊन पोहोचेल.
मराठी चित्रपट हा रसातळापर्यत पोहोचविण्यासाठी डिस्टीब्युटरने देखील लक्ष देणे आवश्यक आहे. बॉलीवुड चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांनादेखील स्क्रीनिंगच्या वेळेस तितकाच सन्मान मिळणे आवश्यक आहे. कारण डिस्टीब्युटर चित्रपट रिलीजविषयी प्रॉमिस करतात आणि रिलीज डेट आली तर ऐनवेळी नाही म्हणतात. तीन महिन्यांनी करू, पुढे पाहू असे टाळाटाळीची उत्तरे देऊ करतात. त्यामुळे डिस्टीब्युटरने गॅरटी देणे आवश्यक आहे.