सेहवाग मुळे सैराट का आठवावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 15:17 IST2017-01-10T15:17:24+5:302017-01-10T15:17:24+5:30

करुण नायरच्या त्रिशतकानंतर सेहवागची आठवण येणं स्वाभाविक आहे पण सेहवाग मुळे सैराट का आठवावा? म्हणजे,  सेहवागनी सैराट बघितला असण्याची ...

Sehwag, why not remember Serrat? | सेहवाग मुळे सैराट का आठवावा?

सेहवाग मुळे सैराट का आठवावा?

ुण नायरच्या त्रिशतकानंतर सेहवागची आठवण येणं स्वाभाविक आहे पण सेहवाग मुळे सैराट का आठवावा?
म्हणजे,  सेहवागनी सैराट बघितला असण्याची शक्यता नाही, आणि सुरुवातीच्या क्रिकेट सामन्याची दृश्य सोडली तर सैराटचा क्रिकेटशी संबंध नाही. पण या दोघांमध्ये खूप साम्य आहे. करुण नायरच्या शतकाच्या उल्लेख करताना सेहवागचा उल्लेख होणं अपरिहार्य आहे. 2016 मराठी चित्रपटसृष्टीचा आढावा घेताना सैराट शिवाय अपूर्ण आहे. खरंतर सैराट आणि नटसम्राट,YZ, वजनदार, व्हेंटिलेटर सारखे बोटावर मोजण्याऐवढे चित्रपट सोडले तर काहीच नाहीये. असो. तर, सेहवाग आणि सैराट.
सेहवाग एखाद्या सामन्यात कसा खेळेल याचा अंदाज कुणालाही बांधता यायचा नाही. म्हणजे तसा तो कुठल्याही खेळाडूचा बांधता येत नाही,पण ,सेहवाग इतका अन्प्रिडिक्टबल खेळाडू विरळच. सैराटच देखील तसंच झालं. त्यांच्या निर्मात्याला अथवा दिग्दर्शकाला देखील सैराटला इतकं यश मिळेल याचा अंदाज नसावा. सेहवागचं झंझावात सुरु झालं की प्रतिस्पर्धी संघाला हातावर हात ठेऊन बघत बसणे या पलीकडे पर्याय नसायचा. सैराटच्या वादळासमोर सगळे चित्रपट उडून गेले. सेहवाग दिल्लीतील, म्हणजे खरंतर हरयाणा सीमेजवळच्या एका छोट्या जिल्हातला. दिल्ली ,मुंबईत कसदार सराव करून अलेली शास्त्रशुद्ध शैली नव्हती त्याची, पण त्याचा एक व्हाइल्ड रिदम होता. त्याच्यातलं आणि सैराट मधलं हे सगळ्यात मोठं साम्यस्थळ. सैराटनी आखून दिलेले सगळे नियम झुगारून दिले. म्हणजे,आज काल मल्टिप्लेसच्या राज्यात चित्रपट साधारण 2 तासाच्या आसपास असेल तर जास्तीत जास्त शोज मिळतात. नवोदित दिग्दर्शक आणि लेखक या चौकटीचे गुलाम होऊनच चित्रपट निर्मिती करतात.सैराट तब्बल 3 तासाचा होता. सेहवाग सारखे सर्व नियम झुगारून देऊन सैराट खेळाला.
 प्रमाण मराठी हा सध्याचा ज्वलंत विषय.परश्या–अर्चीची भाषा प्रमाण भाषेच्या जवळही जाणारी नव्हती. मराठी चित्रपटाचे 60‰ उत्पन्न पुणे शहरातून येते. सेहवागचा खेळ सर्व स्तरातील प्रेक्षकांना बघायला आवडायचा, म्हणजे ज्याला क्रिकेट कळायचं त्याला आणि ज्याला केवळ दोन घटका करमणूक हवी आहे. त्यालाही. सैराटच देखिल तसेच आहे.
अंधेरीतील उच्चभ्रू  मल्टिप्लेसमध्ये वेर्सोवाच्या कोळीणि आणि ” लोखंडवालातल्या हिंदी भाषिकांनी एकत्र हा चित्रपट एन्जॉय केला. पुण्याच्या कोथरूड पासून ,एरवी मराठी चित्रपटाकडे ढुंकूनही न बघणाऱ्या नागपूरकरांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला.बंगलोर सारख्या IT हब मध्ये सैराटनी शंभर दिवस मुक्काम ठोकला.

एरवी,आपल्या मराठी पणाचा फ़ारसा अभिमान नसलेल्या IT क्षेत्रातील मराठी तरुणांना त्याचं मराठीपण आठवलं ते सैराटमुळे. त्यांच्या परप्रांतीय सहकार्यंबरोबर महाराष्ट्रातली जाती व्यवस्था वगैरेबद्दची चर्चा करता आली ती सैराटमुळे.


सैराटनी मराठी चित्रपटसृष्ट्रीतील आकाश आणि रिंकू असे पहिले सुपरस्टार दिले. याच्या आधीचे, उत्तम अभिनेते किंवा स्वयंघोषित सुपरस्टार.  पण एवढी क्रेझ असलेले आणि 7 ते 8 बॉडी गार्डसची खरी गरज म्हणून घेऊन फिरणारे हे पहिलेच. 

आकाश आणि रिंकू दिसायला यथातथाच ,अभिनय वगैरे न शिकलेले. या क्षेत्रात यायला एक जाती व्यवस्था आहेच, म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईतील नाट्यशिबिरात तावून सुलाखून निघाला की नाही?
डोक्यावर पुस्तक ठेऊन,ते न पडता चालायला शिकणे, तोंडात पेन आडवे धरून ''श” आणि ''ष” मधला फरक शिकणे, हे केलंत कि नाही? गेला बाजार, कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेत बॉकस्टेज केलंत तरी तुमच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. या सगळ्यांना वगळून रिंकू आणि आकाश सारख्या नवख्या कलाकारांना घेऊन त्यांचा 
रॉनेस  वापरणे हे नागराज मंजुळेचे सैराट मधले फार मोठे यश. चॅपलसारख्या चुकीच्या कोचनी सेहवागला चौकटीत बांधायचा प्रयन्त केला तेंव्हा सेहवागचा बॉड पॅच चालू झाला. सेहवागच्या निवृत्तीच्या वेळी झालेलं वादंग चटका लावून गेला,जसा सैराटचा शेवट.

सेहवाग आणि सैराट मधलं साम्य इथेच संपतं.
 एका वर्गाला सैराट हे त्यांची कथा वाटली,आजही खेड्या पाड्यात असलेल्या जाती वास्तवाची जाणीव शहरी प्रेक्षकाला करून दिली सैराटनी आणि पायात सिल्पर घालून मल्टिप्लेसमध्ये झिंगाट नाचायची संधी दिली सैराटनी. सेहवागसारखा खेळाडू परत निर्माण होणार नाही,आणि सैराट परत निर्माण करायला लागू नये.


निरंजन विद्यासागर 

Web Title: Sehwag, why not remember Serrat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.