बघतोस काय मुजरा कर टिमची लोकमत आॅफिसला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 15:07 IST2017-01-28T09:37:12+5:302017-01-28T15:07:12+5:30
बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगत आहे. शिवाजी महाराजांना या चित्रपटाच्या माध्यमातून वंदन करण्यात ...
(41).jpg)
बघतोस काय मुजरा कर टिमची लोकमत आॅफिसला भेट
ब तोस काय मुजरा कर या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगत आहे. शिवाजी महाराजांना या चित्रपटाच्या माध्यमातून वंदन करण्यात आले आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टिमने पुण्यातील लोकमत कार्यालयाला भेट दिली. या वेळी कलाकारांनी चित्रपटातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे, क्षितीज पटवर्धन, आदर्श शिंदे आणि संगीतकार अमितराज यावेळी उपस्थित होते. या चित्रपटाकडे राजकारण म्हणून पाहीले जाईल किंवा चित्रपटाला काही अडचणी येतील असे वाटतेय का या प्रश्नावर जितेंद्र सांगतो, नाही मला असे बिलकुलच वाटत नाही. कारण आम्हाला सत्ताधीरी पक्षातीलच अनेकांनी असे सांगितले आहे की, गड किल्ल्यांचे संवर्धन हे झालेच पाहीजे. आणि या चित्रपटाच्या ट्रेलरचा परिणार आहे कि नाही हे मला माहित नाही, पण औरंगाबाद मधील तीन किल्ल्यांना ११ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक हे नक्कीच घडतय असे मला वाटते. तसेच अनिकेत विश्वासराव सांगतोय, आम्ही जेव्हा या चित्रपटाच्या ट्रेलरचे लाँचिंग पहिल्यांदाच सिंहगडावर केले तेव्हा तिथे गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणारे महाराष्ट्रातील अनेक गु्रप्स आले होते. ते पहिल्यांदाच तिथे भेटले. आता हे सर्व गु्रप मेंबर्स एकमेकांच्या संपर्कात राहून अजुन चांगले काम करु शकतील यापेक्षा दुसरा आनंद आम्हाला काहीच नाही. पर्ण सांगतेय, सिनेमाचा विषयच आत्ताच्या काळात महत्वाचा आहे. सध्या शिवाजी महाराजांचे विचार सोडून बाकी सर्व काही समाजात घेतले जात आहे. तो विचार समाजात पोहचावा हा सिनेमाचा प्रयत्न आहे. अक्षय आणि माझा, आमच्या दोघांचा यातील ट्रॅक देखील छान आहे. आम्ही तीनही मुली यांना कशा प्रकारे चित्रपटात साथ देतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील महापुरुषांचे विचार जर कलाकार म्हणुन पोहचवता येत असेल तर यासारखी आनंदाची गोष्ट नाही.