Rinku Rajguruचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते म्हणताहेत, 'किती बारीक झाली आर्ची..!'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 06:59 PM2022-01-03T18:59:44+5:302022-01-03T19:00:11+5:30

रिंकू राजगुरू (Rinku Rajguru)ने साडीतील फोटोमध्ये फ्लॉन्ट केली फिगर

Seeing Rinku Rajguru's transformation, fans say, 'How thin Archie ..!' | Rinku Rajguruचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते म्हणताहेत, 'किती बारीक झाली आर्ची..!'

Rinku Rajguruचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते म्हणताहेत, 'किती बारीक झाली आर्ची..!'

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी आगामी चित्रपटांमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे. आता ती पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने साडीतील फोटोशूट शेअर केले आहे. या साडीतील फोटोतील तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. 

रिंकू राजगुरू हिने नुकतेच नवीन वर्षाच्या चाहत्यांना शुभेच्छा देत साडीतील फोटो शेअर केले आहेत. त्यानंतरही तिने निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. या फोटोत तिने केस मोकळे सोडले असून नाकात नथ घातली आहे. हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. साडीतील फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. तर तिच्या या फोटोवर काही चाहते किती बारीक झाली आर्ची असे कमेंट करत आहेत. तर एका युजरने म्हटले की महाराष्ट्रीयन दीपिका दिसतेय..खूप भारी. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, मराठी मुलगी. तर आणखी एका युजरने लिहिले की, खूपच बारीक झालात. तर एका युजरने लिहिले की, एवढी पातळ का झालीस गं. 


रिंकू राजगुरूच्या ट्रान्सफॉर्मेशनला काहींची पसंती मिळतेय तर काहींना तिचा हा अवतार आवडत नाही. रिंकू राजगुरू लवकरच मराठी चित्रपट छूमंतरमध्ये दिसणार आहे. तसेच झुंड या हिंदी चित्रपटातही झळकणार आहे. 

Web Title: Seeing Rinku Rajguru's transformation, fans say, 'How thin Archie ..!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.