हे पाहा ती सध्या काय करते या चित्रपटात कोणती गाणी असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 15:49 IST2016-12-17T15:49:50+5:302016-12-17T15:49:50+5:30

 सतीशा राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. तसेच या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ...

See what songs she will do in the film | हे पाहा ती सध्या काय करते या चित्रपटात कोणती गाणी असणार

हे पाहा ती सध्या काय करते या चित्रपटात कोणती गाणी असणार

 
तीशा राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. तसेच या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे मराठी चित्रपटसृष्ट्रीत पदापर्ण करत असल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. नुकतेच ती सध्या काय करते या चित्रपटात कोणती गाणी असणार आहेत याचा ज्युकबॉक्स प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात एकूण ४ गाणी आहेत आणि ही चारही गाणी निलेश मोहरिर, अविनाश-विश्वजीत आणि मंदार आपटे यांनी संगीतबध्द केली आहेत. यात जरा जरा आणि  परीकथेच्या पया ही गाणी अश्विनी शेंडे यांनी शब्दबध्द केली असून ती आर्या आंबेकर आणि हृषिकेश रानडे यांनी गायली आहेत.  ह्दयात वाजे समथिंग हे गाणं विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोल यांनी लिहलं आहे तर स्वरबध्द केलंय हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांनी. या चित्रपटात आर्या अभिनय आणि गायिका या दोन्ही जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटाची कथा आहे प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची. ही कथा आहे अनुराग आणि तन्वीची. त्यांच्या शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आजपर्यंतची. या चित्रपटात अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार असून अनुरागची भूमिका हृदित्य राजवाडे, अभिनय बेर्डे आणि अंकुश चौधरी यांनी साकारली आहे. तर तन्वीच्या भूमिकेत निमोर्ही, आर्या आंबेकर आणि तेजश्री प्रधान आहे.  याशिवाय चित्रपटात सुकन्या कुलकर्णी-मोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ६ जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 


Web Title: See what songs she will do in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.