पाहा चंद्रकांत कुलकर्णी काय म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत चांगल्या कलाकृती निर्माण होत नसतील तर तो प्रेक्षकांचा दोष आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 11:48 IST2017-01-16T11:48:03+5:302017-01-16T11:48:03+5:30
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रेक्षकांना सक्षम अशी कथा असणारे चित्रपट पाहायला मिळत नसल्याची ओरड नेहमीच ऐकण्यास मिळत असते. या चित्रपटसृष्टीत एक ...

पाहा चंद्रकांत कुलकर्णी काय म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत चांगल्या कलाकृती निर्माण होत नसतील तर तो प्रेक्षकांचा दोष आहे
म ाठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रेक्षकांना सक्षम अशी कथा असणारे चित्रपट पाहायला मिळत नसल्याची ओरड नेहमीच ऐकण्यास मिळत असते. या चित्रपटसृष्टीत एक दोन चित्रपट सोडले तर बॉक्सआॅफीसवर कोणते चित्रपट चालतात असा प्रश्न अनेकवेळा प्रेक्षकांच्या माध्यमातून उपस्थित राहतो. असाच एक प्रश्न मराठी इंडस्टीतील दिग्दर्शक चंद्रकात कुलकर्णी यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विचारण्यात आला आहे या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत कुलकर्णी सांगतात, प्रत्येक माध्यमाची काही बलस्थाने असतात तशा त्यांना मयार्दाही असतात. याच लक्षात घेत एखाद्या कलाकृतीचे माध्यमांतर व्हायला हवे. तसे झाले तरच तिला न्याय दिला असे म्हणता येईल. तसेच माध्यमांची सीमा असते, साहित्याला ती सीमा नसते. प्रत्येक कलाकृतीचे माध्यमांतर हे होऊ शकते असा समज चुकीचा आहे. प्रत्येक माध्यमांचे स्ट्रक्चर वेगवेगळे असणार हे जाणून घेतलं पाहिजे. एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीची बीजे कुठूनही मिळू शकतात. त्यामुळे एखाद्या घटनेचा, कादंबरीचा, संहितेचा, नाटकाचा, लघुकथेचा, माहितीपटाचा चित्रपट होऊ शकतो. आज जर चांगल्या कलाकृती निर्माण होत नसतील तर तो प्रेक्षकांचा दोष आहे, कारण त्यांनी मागणी केली नाही, तर ती गरज आहे हे कळणार नाही. त्याचप्रमाणे आज चांगल्या कलाकृतींना प्रेक्षक दाद देताना दिसत नाहीत, म्हणून त्यांना मालिकांवरच समाधानी राहावे लागते. असेदेखील ते यावेळी म्हणाले. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मराठी इंडस्टीला अनेक मराठी चित्रपट दिले आहेत. त्यात फॅमिली कट्टा, दुसरी गोष्ट, तुकाराम अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तसेच त्यांचा ध्यानीमनी हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे.