SEE PICS:उर्मिला कोठारेने बेबीशॉवर नंतर सेलिब्रेट केला 'बेबीमून'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 15:33 IST2017-11-28T10:03:55+5:302017-11-28T15:33:55+5:30
उर्मिला कोठारेने नुकतेच धुमधडाक्यात तिचे बेबीशॉवर सेलिब्रेट केले होते.या बेबीशॉवरमध्ये अनेक मराठी अभिनेत्रींनी उपस्थिती लावली होती.

SEE PICS:उर्मिला कोठारेने बेबीशॉवर नंतर सेलिब्रेट केला 'बेबीमून'
ह ीमूननंतर बी-टाऊनमध्ये बेबीमूनला जाण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला.सध्या बी-टाऊनच्या सेलिब्रिटी कपल्समध्ये याची क्रेझ जास्त दिसून येतेय.यामध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूत,रानी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा,इमरान खान आणि अवंतिका मलिक खान या सेलिब्रेटींनी धुमधडाक्यात बेबीमून सेलिब्रेशन केले होते. विशेष म्हणजे बेबीमून हा ट्रेंड आता मराठीत रूढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे या लव्हबर्डनं बेबीमून अनुभवलं.उर्मिला कोठारेने पती आदिनाथ कोठारेसह पेंच अभयारण्यात बेबीमून सेलिब्रेट केला.यावेळी त्यांनी धम्माल मस्ती करतानाचे फोटोही सोशल साईटवर शेअर केले आहेत.
उर्मिलाने नुकतेच धुमधडाक्यात तिचे बेबीशॉवर सेलिब्रेट केले होते.या बेबीशॉवरमध्ये अनेक मराठी अभिनेत्रींनी उपस्थिती लावली होती.डोहाळ जेवणाच्या वेळी उर्मिला आणि आदिनाथने एकाच रंगाचे कपडे घातले होते. उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोत आदिनाथ निळ्या रंगाच्या सदऱ्यात तर उर्मिला निळ्या रंगाच्या साडीत आपल्याला पाहायला मिळाले.उर्मिला आणि आदिनाथच्या आयुष्यात येणाऱ्या बाळाची आदिनाथ आणि उर्मिला सध्या जय्यत तयारी करत असल्याचे आदिनाथने नुकतेच सांगितले. त्याने सीएनक्सशी बोलताना सांगितले होते की, आमच्या आयुष्यात एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. त्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. मी कामात खूप व्यग्र असलो तरी मी जास्तीत जास्त वेळ उर्मिला सोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. तिला मी जितका वेळ देईल, तितका तो कमीच आहे असे आदिनाथ सांगितले.
उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली.चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११मध्ये लग्न केले.