SEE PHOTO: 'फुगे'सिनेमाच्या प्रमोशनसाठी रसिकही लढवतायेत आयडियाची कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 15:39 IST2017-01-24T10:02:52+5:302017-01-24T15:39:08+5:30

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे स्टारर बहुप्रतिक्षित फुगे सिनेमाची चर्चा सध्या जोदरदार सुरू आहे. स्वप्ना वाघमारे जोशी ...

SEE PHOTO: IDEA's idea of ​​fame for the promotion of 'Phuge' cinema | SEE PHOTO: 'फुगे'सिनेमाच्या प्रमोशनसाठी रसिकही लढवतायेत आयडियाची कल्पना

SEE PHOTO: 'फुगे'सिनेमाच्या प्रमोशनसाठी रसिकही लढवतायेत आयडियाची कल्पना

कलेट बॉय स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे स्टारर बहुप्रतिक्षित फुगे सिनेमाची चर्चा सध्या जोदरदार सुरू आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून 'फुगे' हा सिनेमा 10 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येतोय.  सध्या या सिनेमाचे कलाकार अख्या महाराष्ट्रात जोरदार प्रमोशन करताना दिसताये. फक्त सेलिब्रेटीच नाहीतर रसिकही   या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतायेत. स्वप्नील-सुबोधला पहिल्यांदाच एकत्र आणणाऱ्या या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत असताना या सिनेमाचे करण्यात येणारे भन्नाट प्रमोशनही चर्चेचा विषय ठरतोय. एकसे एक भन्नाट आयडीयाची कल्पना करत रसिक या सिनेमाचे हटक्या स्टाइलने प्रमोशन करण्यात बिझी दिसतायेत. 



मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा किरण जाधव या चाहत्याने तर या सिनेमाच्या यशासाठी चक्क कोल्हापूरच्या महालक्ष्मीकडे साकडे घातले आहे. आपल्या लाडक्या हिरोचा सिनेमा हिट व्हावा यासाठी या पट्ठ्याने देवीचा अभिषेक देखील केला. एवढेच नव्हे तर त्यासाठी त्याने भरलेल्या पावतीवर स्वप्नील जोशी यांच्या 'फुगे' सिनेमासाठी लिहिलेला मजकूरचा फोटो ट्वीट करत स्वप्नील जोशीबद्दलचे त्याचे प्रेम सिद्ध केले आहे. जेव्हा स्वप्नीलला याविषयी कळाले तेव्हा त्याने आपल्या चाहत्याचे ट्वीट करत आभार मानले असून रसिकांकडून इतके भरभरून प्रेम मिळत असल्याचे पाहून खूप  आनंद झाला आहे जो शब्दात व्यक्त करणेही कठीण आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.




'फुगे' या नावातच धम्माल मस्ती असलेल्या आगामी चित्रपटाची संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनाआधीच मोठी चर्चा होत आहे. हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला प्रदर्शित होत असल्यामुळे स्वप्नील आणि सुबोधच्या चाहत्यांनीदेखील आपापल्यापरीने 'फुगे' चे प्रमोशन करायला सुरुवात केली आहे. खास करून मराठीचा रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वप्नील जोशीच्या महिला चाहत्यापैकी एकीने 'फुगे' सिनेमाचे नाव असलेली मेहंदी आपल्या हातावर रेखाटून घेतली आहे.



तर एकीने १० फेब्रुवारी 'फुगे' असे नाव कोरलेली संत्री बाजारात विकायला ठेवली आहेत. एवढेच नाही तर, स्वप्नील जोशीची चाहत्या असलेल्या एका महिला शिक्षिकेने आपल्या शाळेतील मुलांचा 'पार्टी दे' या गाण्यावर नाच बसवत, हा व्हिडियो सोशल साईटवर पोष्ट केला आहे.लव्हस्टोरी नव्हे तर प्रेमाची हटके बॅकस्टोरी सांगणारा हा सिनेमा एका वेगळ्याच धाटणीचा असल्याचे पाहायला मिळते.सिनेमाची प्रदर्शनापुर्वीच रसिकांकडून कौतुक होत असलेली पब्लिसिटी लक्षात घेता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही हाउसफुल कामगिरी करेल  असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

Web Title: SEE PHOTO: IDEA's idea of ​​fame for the promotion of 'Phuge' cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.