पाहा कसा असणार आहे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 13:20 IST2017-01-13T13:20:14+5:302017-01-13T13:20:14+5:30
यंदा पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवचे हे १५ वे वर्ष आहे. महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवचे आयोजन केले जाते. ...

पाहा कसा असणार आहे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
य दा पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवचे हे १५ वे वर्ष आहे. महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवचे आयोजन केले जाते. या महोत्सवाला दरवर्षी मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा हे महोत्सव चार चाँद लावणार असल्याचे पाहायला मिळत आहे. हा महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान भरविण्यात आला आहे. या महोत्सवाच्या सुरूवातीलाच डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, अरविंद आणि प्रकाश चाफळकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर बार्बरा एडर दिग्दर्शित थँकयू फॉर बॉम्बिंग (आॅस्ट्रिया) हा चित्रपट ओपनिंग फिल्म दाखविण्यात आला. तर इंडो - स्पेन मैत्रीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मिस मोनिका, सुब्रता डे आणि कारलॉस ब्लॅन्को यांनी फ्लेमिंको हा नृत्यप्रकारही यावेळी सादर करण्यात आला.
भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. याशिवाय संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा यावषीर्चा एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवार्ड तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांना प्रदान करण्यात आला.
याबरोबरच यावर्षीच्या विजय तेंडूलकर मेमोरियल व्याख्यानात चिलीचे जर्जी अरीगेडा हे संगीत ध्वनिंचा चित्रपटात होणारा वापर या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर पिफ बझार अंतर्गत याहीवर्षी व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे यांची पर्वणी असेल. यामध्ये माध्यमांतर, कविता, व्हर्च्युअल रिअॅलिटी फॅड की फ्युचर यांसारख्या विविध विषयांवर चर्चा होतील. पिफ बझार अंतर्गत उभे राहणा-या पॅव्हेलियनचे नाव यावर्षी दादासाहेब फाळके पॅव्हेलियन असे असणार असून दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ यामध्ये असणा-या मुख्य स्टेजचे नामकरण ओम पुरी रंगमंच असे करण्यात आले आहे. तसेच पिफ बझार मध्ये जेम्स आॅफ एनएफएआय या विभागाअंतर्गत एनएफएआय मधील चित्रपट पाहण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आठ ठिकाणी १३ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट पाहता येणार आहे. यामध्ये सिटी प्राईडकोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड आर झ्र डेक्कन, मंगला मल्टिप्लेक्स, आयनॉक्सबंडगार्डन रस्ता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि चिंचवड येथील कार्निव्हल सिनेमा व आयनॉक्स या चित्रपट गृहांचा समावेश आहे.