पाहा रितेश किती वर्षांचा झाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 15:39 IST2016-12-17T15:39:18+5:302016-12-17T15:39:18+5:30
बॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केलेला मराठमोळा मुलगा रितेश देशमुख आज त्याचा वाढदिवस साजरा करीत आहे. लातूरमध्ये १९७८ मध्ये ...

पाहा रितेश किती वर्षांचा झाला?
ॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केलेला मराठमोळा मुलगा रितेश देशमुख आज त्याचा वाढदिवस साजरा करीत आहे. लातूरमध्ये १९७८ मध्ये जन्मलेल्या रितेशने रामोजी राव यांच्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याची नायिका होती जेनेलिया डिसुझा. हिच जेनेलिया त्याच्या आयुष्याची साथीदार बनली. २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपट आला आणि रितेशची वाहवा झाली. त्यानंतर २००४ मध्ये आलेल्या 'मस्ती' या विनोदी चित्रपटाने आणि 'बर्दाश्त' या चित्रपटाने त्याच्या लोकप्रियतेत भर टाकली.
'मस्ती' चित्रपटातील रितेशच्या अभिनयाची दखल फिल्म फेअर पुरस्कारानेही घेतली.
रितेश गेली १३ वर्षे चंदेरी दुनियेत यशस्वी अभिनेता म्हणून वावरतोय. 'ग्रँड मस्ती', 'ग्रेट ग्रँड मस्ती' 'हाउसफुल 2', 'हाउसफुल 3', 'बैंगिस्तान', 'क्या सुपर कूल हैं हम', 'डबल धमाल', 'जाने कहां से आयी है', 'अलादीन', 'अपना सपना मनी मनी' और 'एक विलेन' यासारख्या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विलासराव देशमुख आणि वैशाली देशमुख यांचा सुपुत्र असलेला रितेश राजकारणापासून चार हात लांबच राहिला आहे. अनेक लोकांना माहिती नसेल की रितेशने आपल्या करियरची सुरुवात एक आर्किटेक म्हणून केली होती.
रितेशने मुंबईतील कमला रहेजा कॉलेज आॅफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्टचे शिक्षण घेतले. त्यानंतर परदेशात जाऊन एका आर्किटेक्ट फर्ममध्ये एक वर्षे प्रॅक्टीसही केली. अभिनय, स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस यात बिझी असलेला रितेश आर्किटेक्चरल अँड इंटीरियर डिजाइनिंग फर्म 'इवोल्यूशन्स'देखील चालवतो.
रितेशने २०१३ मध्ये आपल्या स्वत:च्या 'मुंबई फिल्म कंपनी' या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना करीत 'बालक पालक' या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर 'लय भारी' या चित्रपटातून रितेशने मराठी सिनेसृष्टीत दमदार पाऊल टाकले.
त्याने सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये 'वीर मराठी' क्रिकेट टीम लाँच केली आहे. यात त्याचा भाऊ धीरज देशमुख पार्टनर आहे आणि याची ब्रँड अम्बॅसेडर जेनेलिया देशमुख आहे.
रितेशचा विवाह २ फेब्रुवारी २०१२ मध्ये जेनेलियाशी झाला. त्यांना २५ नोव्हेंबर २०१४ रोजी पहिला मुलगा झाला.
यंदाचे वर्ष रितेशसाठी खास आहे. १ जून २०१६ रोजी रितेश - जेनिलियाला दुसरा मुलगा झाला. यावर्षी त्याच्या 'हाउसफुल 3' चित्रपटाने भरपूर गल्ला जमवलाय तर 'बँजो' या चित्रपटानेदेखील सर्वांची वाहवा मिळवली. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचा 'फास्टर फेणे' हा चित्रपट निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट निर्मितीत तो सध्या गुंतलाय. उद्या १७ डिसेंबर रोजी तो ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. रितेशला त्याच्या वाढदिवसाच्या आमच्याकडून हार्दीक शुभेच्छा.