नेहा महानजनच्या यशाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 14:19 IST2017-01-02T14:19:38+5:302017-01-02T14:19:38+5:30

प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहनची आवश्यकता असते. अशावेळी व्यक्ती ही अनेक यशस्वी माणसांची आत्मचरित्र, भाषण सातत्याने ऐकत ...

The secret of Neha Mahajan's success | नेहा महानजनच्या यशाचे रहस्य

नेहा महानजनच्या यशाचे रहस्य

रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहनची आवश्यकता असते. अशावेळी व्यक्ती ही अनेक यशस्वी माणसांची आत्मचरित्र, भाषण सातत्याने ऐकत असतात. आणि त्याप्रमाणे त्या लोकांना फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा या यशस्वी लोकांमध्ये व्यक्तीना कलाकार हे अगदी जवळचे वाटत असतात. त्यामुळे लोक ही कलाकारांचा स्ट्रगल आणि त्यांचे यश जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आता हेच पाहा ना, खास लोकांसाठी अभिनेत्री नेहा महाजनचे यशाचे रहस्य लोकमत सीएनएक्सने जाणून घेतले आहे. नेहा सांगते, मी दर तीन महिन्याला माझ्या कामाचे शेडयुल्डचे नियोजन करत असते. या नियोजनमध्ये मला काय करायचे आहे. जसे की, वाचन, फिटनेस आणि भाषा यामध्ये कसा विकात्सक दृष्टया बदल करायचा याचा विचार करते. त्याचबरोबर सकारात्मक विचार करण्यावर मी विश्वास ठेवते. कोणत्या गोष्टी टाळायच्या याचादेखील विचार करते आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते. आ़युष्यात काय चांगल करू शकतो यावर माझा जास्त फोकस असतो. तसेच प्रत्येक वर्षी आ़युष्यात काय चांगले आणि काय वाईट घडले आहे. या गोष्टींचा वर्षाच्या शेवटी रिझल्ट लावते. रिझल्ट लावल्यानंतर त्यातून स्वत:मध्ये काय बदल करायचा हे ठरवून स्वत:मध्ये बदल करते. नेहाने मराठी इंडस्टीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने कॉफी आणि बरचं काही, वन वे तिकीट, निळकंठ मास्तर असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत. त्याचप्रमाणे सध्या ती गाँव या हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. 


Web Title: The secret of Neha Mahajan's success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.