मुखवट्यामागील रहस्य आता १९ आॅगस्टला उलगडणार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 12:51 IST2016-08-03T07:19:55+5:302016-08-03T12:51:41+5:30
गेल्या अनके दिवसांपासून चर्चेत असलेला चौर्य हा चित्रपट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या ५ आॅगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात ...
.jpg)
मुखवट्यामागील रहस्य आता १९ आॅगस्टला उलगडणार!!
ग ल्या अनके दिवसांपासून चर्चेत असलेला चौर्य हा चित्रपट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या ५ आॅगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज असलेला परंतु अवघ्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी चित्रपट प्रदर्शित करणे असंवेदनशील असल्यामुळे चौर्य या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता हा चित्रपट येत्या १९ आॅगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे निमार्ते निलेश नवलखा आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी सांगितले. नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांची निर्मिती असलेल्या, राजन आमले सहनिर्मित "चौर्य" चित्रपटाची प्रस्तुती नवलाखा आर्ट्स व साधना सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. चौर्य चित्रपटात अभिनेते किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर आणि आरजे श्रुती आदीं कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, डॉ. गणेश चंदनशिवे आणि गायिका उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजात ही चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली असून शंकरराव धामणीकर, विष्णू थोरे आणि समीर आशा पाटील यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत. चित्रपटातील तीनही गाणी ही वेगळ्या पठडीतील असून संगीत मयुरेश केळकर याचे आहे. श्रीशैल हिरेमठ आणि जितेंद्र पंडित यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून केतन माडीवाले याने या चित्रपटाचे संकलन केले आहे. राज ङगर यांचे कलादिग्दर्शन असून भक्ती नाईक व गणेश चंदनशिवे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.