सौरभ गोखले पुन्हा छोटया पडदयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 11:09 IST2017-01-27T05:35:44+5:302017-01-27T11:09:11+5:30

राधा ही बावरी या मालिकेतून अभिनेता सौरभ गोखले याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याला पुन्हा छोटया पडदयावर पाहण्यासाठी प्रेक्षक ...

Saurabh Gokhale again on the small screen | सौरभ गोखले पुन्हा छोटया पडदयावर

सौरभ गोखले पुन्हा छोटया पडदयावर

धा ही बावरी या मालिकेतून अभिनेता सौरभ गोखले याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याला पुन्हा छोटया पडदयावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहे. आता मात्र प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली आहे. कारण प्रेक्षकांचा हा लाडका  कलाकार पुन्हा छोटया पडदयावर पाहायला मिळणार असल्याचे त्याने लोकमत सीएनएक्सला सांगितले.

        सौरभ सांगतो, छोटया पडदयावर येण्यासाठी मी स्वत:देखील खूप उत्सुक आहे. मात्र एका चांगल्या आणि हटक्या भूमिकेची मी वाट पाहत होतो. फायनली मला एक हटके भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. माझी ही वेगळी भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेन असे मला वाटते. आतापर्यत मला मालिकांच्या आॅफर येत होत्या. मात्र त्याच टिपिकल मालिका करयाच्या नव्हत्या. म्हणून मी थांबलो होतो. आता लवकरच प्रेक्षकांना मी छोटया पडदयावर पाहायला मिळेल. या मालिकेच नाव अदयाप ही गुलदस्त्यात आहे. तसेच या मालिकेत कोण कलाकार असणार आहे यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस पाहावी लागणार आहे.

        सौरभची राधा ही बावरी या मालिकेतील भूमिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री श्रुती मराठे पाहायला मिळाली होती. त्याची या मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता सौरभ हा  पेज फोर या आगामी चित्रपटाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांना दिसणार आह. या चित्रपटात त्याच्यासोबत विभावरी देशपांडे, गौतमी देशपांडे, निखिल राऊत असे अनेक कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण संपले असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच सध्या तो छडा या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या या नाटकाची चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे सौरभ हा मलिका, नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. 

Web Title: Saurabh Gokhale again on the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.