संतोष जुवेकर झळकणार या बॉलिवुडच्या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 12:34 IST2016-11-13T14:26:48+5:302016-12-15T12:34:29+5:30

   बेनझीर जमादार सध्या मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांची बॉलिवुडविषयी लॉटरी लागली असल्याचे दिसत आहे. आता हेच पाहा ना, नुकताच अभिनेता ...

Santosh Juvekar will be seen in this Bollywood movie | संतोष जुवेकर झळकणार या बॉलिवुडच्या चित्रपटात

संतोष जुवेकर झळकणार या बॉलिवुडच्या चित्रपटात

   बेनझीर जमादार


सध्या मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांची बॉलिवुडविषयी लॉटरी लागली असल्याचे दिसत आहे. आता हेच पाहा ना, नुकताच अभिनेता गश्मीर महाजनी याचा डोंगरी का राजा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता याच्यापाठोपाठ संतोष जुवेकरदेखील प्रेक्षकांना बॉलिवुडमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्या या बॉलिवुड चित्रपटाविषयी संतोष लोकमत सीएनएक्सला सांगतो, हो, मी आश्चर्यफकीट या बॉलिवुड चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मी मुख्य भुमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात माझ्यासोबत प्रियांका घोषदेखील प्रेक्षकांना दिसणार आहे. खरचं हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे. मात्र बॉलिवुड चित्रपट असल्यामुळे मला टेन्शन वगैरे काही आल नाही. कारण ज्याप्रमाणे माझ्यासाठी मराठी चित्रपट आहे. त्याप्रमाणेच हा बॉलिवुड चित्रपटदेखील आहे. या चित्रपटात भाषा सोडली तर दुसरे असे काहीच वेगळे नाही. काम करण्याची पध्दतदेखील सारखीच आहे. माझ्यासाठी हा खूपच चांगला प्रोजेक्ट आहे. तसेच बॉलिवुड चित्रपट मिळाल्यामुळे इथेच न थांबता या पुढे ही पाउल टाकत अधिक चांगला प्रयत्न करणार असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले आहे. सध्या तो अस्सं सासर सुरेखबाई या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्याने मोरय्या, झेंडा, शाळा, रेगे, ३१ डिसंबर, मॅटर, सुख म्हणजे नक्की काय असते असे अनेक चित्रपट केले आहेत. तसेच तो यापूर्वीदेखील प्रेक्षकांना हिंदी चित्रपटात पाहायला मिळाला होता. आता मात्र संतोषची गाडी सुसाट निघाल्याचे दिसत आहे. कारण त्याचा अंडरवर्ल्ड छोटा राजनच्या जीवनाशी संबंधीत चित्रपटदेखील येणार आहे. या चित्रपटात तो स्वत: राजनच्या भूमिकेत असणार आहे. त्याचबरोबर त्याचा ए नावाचा आगामी मराठी चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या संतोषच्या करिअरला चार चॉंद लागल्याचे दिसत आहे. 

Web Title: Santosh Juvekar will be seen in this Bollywood movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.