मंगेश हाडवळेवर संजय लीला भन्साळी कॅम्पमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 17:04 IST2017-08-31T11:34:08+5:302017-08-31T17:04:08+5:30
संजय लीला भन्साळी हे आज बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मानले जाते. हम दिल दे चुके सनम, बाजीराव मस्तानी यांसारखे ...

मंगेश हाडवळेवर संजय लीला भन्साळी कॅम्पमध्ये
स जय लीला भन्साळी हे आज बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मानले जाते. हम दिल दे चुके सनम, बाजीराव मस्तानी यांसारखे चित्रपट संजय लीला भन्साळीने बॉलिवूडला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अनेक नवोदितांना असते. मराठी इंडस्ट्रीत आपले नाव कमावणाऱ्या एका लेखक-दिग्दर्शक आता संजय लीला भन्साळीसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
‘टिंग्या’ हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. याच चित्रपटामुळे मंगेश हाडवळेकर हे नाव प्रकाशझोतात आले. या चित्रपटानंतर मंगेशने ‘देख इंडियन सर्कस’ या हिंदी सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन केले. निर्माता आणि लेखक म्हणून ‘टपाल’ केला. त्याच्या सगळ्याच चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण ‘टिंग्या’नंतर मंगेश मराठीत दिसला नाही. तो सध्या काय करतोय हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण त्याच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो भन्साळी कॅम्पसोबत काम करत आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन हाऊसचे दोन सिनेमे मंगेशने दिग्दर्शक म्हणून साईन केले आहेत. त्यातील पहिल्या सिनेमावर त्याचे सध्या काम सुरू झाले आहे. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन मंगेशचेच असणार आहे.
संजय लीला भन्साळी यांची भाची शार्मिन सेहगल तसेच अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी या दोघांचे पदार्पण असलेला हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाचे नाव अजून ठरलेले नाही. हा एक म्युझिकल रोमँटिक सिनेमा असणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे.