सईच्या वजनदार टिप्स....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:12 IST2016-11-08T17:53:33+5:302016-11-09T17:12:55+5:30

  Priyanka londhe             वजनदार या चित्रपटात आपल्याला सई ताम्हणकर एकदमच वेगळ्या अंदाजात दिसत ...

Sai weight tips ... | सईच्या वजनदार टिप्स....

सईच्या वजनदार टिप्स....

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">  Priyanka londhe
   
        वजनदार या चित्रपटात आपल्याला सई ताम्हणकर एकदमच वेगळ्या अंदाजात दिसत आहे. वजन वाढवलेली, टिपिकल साडीत नेसणारी सई या चित्रपटात कावेरीची भूमिका साकारत आहे. सध्या सगळीकडेच वजनदारची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाविषयी सईने मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा खास तुमच्यासाठी...
 
वजनदार या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील ?
कावेरी ही पुण्यात वाढलेली, शिकलेली आणि मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलगी असते. मध्यवर्गीय कुटुंबातली असूनही स्वतंत्र विचार करणाऱ्या कावेरीचे लग्न ऑर्थोडॉक्स कुटुंबात होते. तिच्या सासरी स्त्रियांनी डोक्यावर पदर घेण्याची परंपरा असते. तिचा नवराही ऑर्थोडॉक्स विचारसरणीचा असतो. वजन कमी करण्यासाठी स्त्रियांनी जीममध्ये न जाता घरातील एखादी कामवाली न ठेवता स्वत: घरातील काम करुन वजन कमी करावे या विचारांचा तो असतो. 
 
 प्रियाचे आणि तुझे ट्युनिंग कसे जमले ?
आमचे ट्युनिंग चांगले आहे कारण आमचे नाते ऑफ स्क्रीन देखील चांगले आहे. प्रियाची एनर्जी खूप जास्त आहे. ती माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. मला तिचे कौतुक वाटते. आमचा प्रवास उलटा आहे. कारण आम्ही आधी चित्रपटासाठी भेटलो. शूटिंगदरम्यान आमची मैत्री घट्ट झाली आणि आजही आम्ही एकमेंकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. 
 
 
एखादया भूमिकेसाठी जेव्हा कलाकार मेकओव्हर करतात, त्यावेळी दुसरे चित्रपट स्वीकारताना अडचण येत नाही का?
एकाच वेळी चार-पाच चित्रपट सध्याच्या काळात तरी कोणी करीत नाही. किंवा एकाच दिवशी दोन चित्रपटांचे शूटिंग देखील नसते. पण मी मध्यंतरी वजनदार करत असताना काही चित्रपटांसाठी शूट केले होते.  एखादी गोष्ट करुन दाखवायची असे एकदा ठरवले तर कोणत्याच कलाकाराला अडचणींना सामोरे जावे लागत नाही असे मला वाटते. 
 
 मुलींना झटपट बारीक व्हायचे असते, त्याबद्दल तुझे मत काय आहे ?
सध्या सगळ्यांनाच प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते.  प्रत्येकालाच आजकाल बारीक व्हायची इच्छा असते. पण ती काही सोपी गोष्ट नाही. ते तुमचे शरीर आहे त्यासोबत खेळ करुन चालणार नाही ही गोष्ट सर्वांनीच समजून घ्यायला हवी. प्रत्येकाच्या शरीरयष्टी वेगळी असते. काही जन्मत: जाड असतात तर काही बारीक असतात. त्यामुळे जर तुमच्या शरीराला बारीक व्हायला वेळ लागणार असेल तर तो तुम्ही त्याला द्यायलाच हवा. 

Web Title: Sai weight tips ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.