सई ताम्हणकर वेबसीरीजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 17:01 IST2017-01-07T14:37:06+5:302017-01-07T17:01:58+5:30

 सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार वेबसीरीजच्या प्रेमात पडलेले दिसत आहे. त्याचप्रमाणे मराठी वेबसीरीज येण्याचे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसत आहे. ...

In Sai Tamhankar Websearies | सई ताम्हणकर वेबसीरीजमध्ये

सई ताम्हणकर वेबसीरीजमध्ये

 
ध्या मराठी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार वेबसीरीजच्या प्रेमात पडलेले दिसत आहे. त्याचप्रमाणे मराठी वेबसीरीज येण्याचे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसत आहे. आता हेच पाहा ना, अमेय वाघ, संतोष जुवेकर, पुष्कराज चिरपुटकर, कुशल भ्रद्रिके यांच्यापाठोपाठ आता, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरदेखील प्रेक्षकांना एका वेबसीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. योलो असे या वेबसीरीजचे नाव आहे. ही वेबसीरीज नुकतीच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या वेसीरीजची कथा ४ वेगवेगळ्या कुटुंबातील मित्रमैत्रिणीची आहे. चोको, परी, सारिका आणि रोचक  अशी त्यांची पात्र आहेत. वेगवेगळ्या संस्कृती, परंपरेने वाढलेली ही चौघं पण त्यांचा आयुष्यातील पाहण्याचा दृष्टीकोन, त्यांची स्वप्न मात्र सारखीच आहे. सोनी लिव्हवरील ही पहिली मराठी वेब सिरीझ  ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दर बुधवारी प्रेक्षकांना ही वेब मालिका पाहायला मिळणार आहे. यामध्ये शिवानी रंगोळे, शिवराज वायचळ, सई ताम्हणकर, ऋतुराज शिंदे, आनंद इंगळे, आणि इतर अनेक कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. सई ताम्हणकरने यापूर्वी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याचप्रमाणे त्याने आपल्या अभिनयाने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच सईने काही दिवसांपूर्वीच रेड रॅबिट व्हाईट रॅबिट या नाटकाच्या माध्यमातूनदेखील आपली कला रंगभूमीवर सादर केली आहे. विशेष म्हणजे तिच्या या नाटकाला दिग्दर्शक नव्हते. या नाटकाची स्क्रिप्टदेखील तिला  थेट रंगभूमीवर मिळाली होती. अशी ही प्रेक्षकांची लाडकी सई आता वेबसीरीजमध्ये पाहायला मिळणार असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. 

Web Title: In Sai Tamhankar Websearies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.