सई ताम्हणकरने बीचवर कोणाचा पकडला हात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 17:00 IST2017-03-28T11:19:27+5:302017-03-28T17:00:44+5:30

मराठमोळ्या सई ताम्हणकरनं जेव्हा या बिकीनी अवतारात रुपेरी पडद्यावर एंट्री मारली तेव्हा रियलमध्येही सारेच म्हणू लागले जपून जपून जरा पुढे धोका ...

Sai Tamhankar seized the beach on the wall? | सई ताम्हणकरने बीचवर कोणाचा पकडला हात?

सई ताम्हणकरने बीचवर कोणाचा पकडला हात?

ाठमोळ्या सई ताम्हणकरनं जेव्हा या बिकीनी अवतारात रुपेरी पडद्यावर एंट्री मारली तेव्हा रियलमध्येही सारेच म्हणू लागले जपून जपून जरा पुढे धोका आहे... कारण समोर होती हॉट बेब सई...मराठीची हॉट बेब सई ताम्हणकरने अशाच एका बेटावर बिकनी घालुन पुढे धोका म्हणत तरूणाईला वेड लावंले होते.गुलाबी रंगाची बिकनी घालत सईने अक्षरश: धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले.नेहमीच ती तिच्या वेगवेगळ्या स्टायलिश लूक असलेले फोटो इन्स्टाग्रामवर टाकत असते. या फोटोंवर तिचे चाहतेही भरभरून कौतुकाचा वर्षाव करत असतात. सा-यांची फेव्हरेट अभिनेत्री आणि मराठीतली बिकीनी गर्ल सई ताम्हणकर आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड करत असते. आता पुन्हा एकदा तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या फोटोत  ती बिकनीत दिसतेय.मात्र फोटोत तिचा चेहरा दिसत नसून फक्त बॅकसाईड फोटो क्लिक करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या फोटोत सई ताम्हणकरने या फोटोत कोणाचा हात पकडला असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे फोटोत सईने कोणाचा हात पकडला आहे ? हा प्रश्न चाहत्यांना भेडसावत असल्याचे पाहायला मिळत आहे.सईने अपलोड केलेल्या फोटोत ''Meanwhile In Goa'' अशी कॅप्शनही टाकली आहे.यावरून तिने हा गोव्यातील नयनरम्य बीचवर व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे समजतंय.नेहमीप्रमाणेच सईच्या इतर फोटोप्रमाणे हा बिकनी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फोटोत दिसणारा हात नेमका कोणाचा? हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.एकूणच काय तर सईचा हा बोल्ड आणि सेक्सी अंदाज पाहून फॅन्स नक्कीच म्हणतील सई... सही रे सही.......

 
 

Web Title: Sai Tamhankar seized the beach on the wall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.