Video: सई करतीये भाऊ कदमला डेट? निलेश साबळेने दिला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 05:02 PM2023-03-24T17:02:56+5:302023-03-24T17:04:03+5:30

sai tamhankar: निलेश साबळेने झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात केला भन्नाट खुलासा

Sai tamhankar date with bhau Kadam Watch Nilesh Sables funny video | Video: सई करतीये भाऊ कदमला डेट? निलेश साबळेने दिला पुरावा

Video: सई करतीये भाऊ कदमला डेट? निलेश साबळेने दिला पुरावा

googlenewsNext

यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav Awards) सोहळा विविध कारणांसाठी चर्चेत येत आहे. या सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. त्यामुळे सध्या या सोहळ्याचे अनेक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच सध्या अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आणि निलेश साबळे (nilesh sable) यांचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये सई अभिनेता, विनोदवीर भाऊ कदमला  (bhau kadam) डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निलेश साबळे आणि श्रेयस तळपदे, सई ताम्हणकरची मस्करी करताना दिसून येत आहेत. यात निलेश साबळे,सईच्या जीवनात एक खास व्यक्ती असून त्याला ती डेट करत असल्याची बातमी दिली. सोबतच पुरावा म्हणून त्याने स्क्रीनवर एक फोटोही पोस्ट केला. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये सईसोबत भाऊ कदम होता. सई आणि भाऊ यांचा हा एकत्र फोटो पाहिल्यावर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला.

दरम्यान, सध्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सईने झी चित्र गौरव पुरस्कार पटकावला. 'मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्काराची सई मानकरी ठरली आहे.
 

Web Title: Sai tamhankar date with bhau Kadam Watch Nilesh Sables funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.