​सई ताम्हणकर आणि शरद केळकरचा राक्षस होणार २३ फेब्रुवारीला प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 06:52 AM2018-02-05T06:52:41+5:302018-02-05T12:22:41+5:30

राक्षस हा शब्द उच्चारताच आपल्या मनात निर्माण होते भय आणि गूढ अशा भावनांचे मिश्रण. जंगल हे फक्त जीवसृष्टीनेच भरलेले ...

Sai Tamhankar and Sharad Kelkar will appear on February 23 | ​सई ताम्हणकर आणि शरद केळकरचा राक्षस होणार २३ फेब्रुवारीला प्रदर्शित

​सई ताम्हणकर आणि शरद केळकरचा राक्षस होणार २३ फेब्रुवारीला प्रदर्शित

googlenewsNext
क्षस हा शब्द उच्चारताच आपल्या मनात निर्माण होते भय आणि गूढ अशा भावनांचे मिश्रण. जंगल हे फक्त जीवसृष्टीनेच भरलेले नसून त्यात अनेक क्लिष्ट कोडी दडलेली असतात. जेव्हा सामान्य माणूस हा जंगलांच्या गूढ दुनियेत शिरतो, तेव्हा नेमकं काय घडते हे राक्षसच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर  येणार आहे. मराठी मधील बहुचर्चित सस्पेन्स थ्रिलर  असलेल्या ‘राक्षस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून यामुळे ‘राक्षस’ बद्दल प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइनचे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित समित कक्कड यांच्या समित कक्कड फिल्म्स प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित राक्षसने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. ती उत्कंठा आता या ट्रेलर मुळे आणखी वाढली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी राक्षसच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे.
‘राक्षस’ ही एक जंगलात घडणारी कथा आहे. जंगल म्हणजे फक्त घनदाट झाडांचा समूह नाही तर त्याला ही भावना असतात. जंगल हसतं, रडतं, गाणं  गातं. किर्रर्र अशा अरण्यात एक छोटी मुलगी आपल्या आईला म्हणजेच सई ताम्हणकरला सांगतेय, बाबांना राक्षसाने गिळलय' तर दुसरीकडे सई कशाचा तरी शोध घेताना दिसत आहे. शरद केळकर आदिवासी पाड्यावर तर कधी जंगलात दिसतोय. हे नेमकं काय रहस्य आहे? याचे उत्तर 'राक्षस' या चित्रपटात बघायला मिळणार आहे. 
राक्षस चित्रपटात बालकलाकार ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सईद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे, पंकज साठे, अनुया कळसकर, अनिल कांबळे, मकरंद साठे, जयेश संघवी, सविता प्रभुणे, साक्षी व्यवहारे, अभिजित झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. आदिवासी पाडयांवर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी तन्मयी देव यांच्यासह ‘राक्षस’ची कथा लिहिली आहे. या ‘राक्षस’मध्ये नेमकं काय रहस्य आहे? हे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना समजणार आहे.

Also Read : सई ताम्हणकरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Web Title: Sai Tamhankar and Sharad Kelkar will appear on February 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.