अंकुश चौधरी देवा या चित्रपटात दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 17:43 IST2017-07-08T11:34:49+5:302017-07-08T17:43:28+5:30

अंकुश चौधरीने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. दुनियादारी, डबल सीट असे एकाहून एक ...

In the role of Ankush Chaudhary God, in this film | अंकुश चौधरी देवा या चित्रपटात दिसणार या भूमिकेत

अंकुश चौधरी देवा या चित्रपटात दिसणार या भूमिकेत

कुश चौधरीने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. दुनियादारी, डबल सीट असे एकाहून एक हिट चित्रपट त्याने मराठी चित्रपटासृष्टीला गेल्या काही काळात दिले आहेत. ती सध्या काय करते या त्याच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनी देखील त्याची प्रशंसा केली होती. ती सध्या काय करते या चित्रपटाला मिळालेले यश पाहाता हे वर्षं त्याच्यासाठी खूप चांगले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. 
अंकुश चौधरीचा या वर्षांत आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. देवा असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा अंकुश पाहायला मिळणार आहे. अंकुशच्या या लूकची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. रंगीत सदरा, फॅन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची मॉडर्न स्टाईल असा या चित्रपटातील अंकुशचा लूक असणार आहे. या लूकप्रमाणेच या चित्रपटातील त्याची भूमिकादेखील काहीशी हटके असणार आहे. या चित्रपटात तो प्रत्येकाला मदत करण्यास तत्पर असणाऱ्या एका व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव देवा असून तो सगळ्यांचा लाडका दाखवला जाणार आहे.
अंकुशचा देवा हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्सना काही दिवस तरी त्याच्या या चित्रपटासाठी वाट पाहावी लागणार आहे. 

Also Read : अंकुश चौधरी झळकणार नव्या चित्रपटात

Web Title: In the role of Ankush Chaudhary God, in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.