​रोहित शेट्टीच्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 15:41 IST2017-05-11T10:11:18+5:302017-05-11T15:41:18+5:30

रोहित शेट्टीने गोलमाल, संडे, गोलमाल रिटर्न्स, सिंघम, गोलमाल 3, चेन्नई एक्सप्रेस, सिंघम रिटर्न्स, दिलवाले यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट ...

Rohit Shetty's Marathi film will be shot soon | ​रोहित शेट्टीच्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच होणार सुरू

​रोहित शेट्टीच्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच होणार सुरू

हित शेट्टीने गोलमाल, संडे, गोलमाल रिटर्न्स, सिंघम, गोलमाल 3, चेन्नई एक्सप्रेस, सिंघम रिटर्न्स, दिलवाले यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडनंतर तो आता मराठी चित्रपटांकडे वळला आहे.
मराठी चित्रपटांचे यश पाहाता अजय देवगण, अक्षय कुमार यांसारखे अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी सध्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रोहित शेट्टी मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची बातमी गेल्या कित्येक दिवसांपासून येत आहे. शाहरुख खान आणि राहित शेट्टी मिळून मराठी चित्रपट बनवणार असल्याचे म्हटले जात होते. दिलवाले, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटांनंतर त्या दोघांनी मराठी चित्रपटांवर काम करण्याचे म्हटले जात होते. पण रोहित गेल्या काही महिन्यांपासून गोलमाल या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. गोलमाल या चित्रपटाचे आतापर्यंतचे सगळेच सिझन प्रचंड हिट झाल्याने या चित्रपटाकडून रोहितला खूप अपेक्षा आहेत.
रोहित सध्या खतरों के खिलाडी या कार्यक्रमात व्यग्र आहे. या चित्रपटात तो सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी तो लवकरच स्पेनला रवाना होणार आहे. पण तिथून परतल्यावर या वर्षाच्या अखेरीस तो त्याच्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे आणि ही बातमी त्याने स्वतः सांगितली आहे. रोहित सांगतो, मी मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची बातमी खरी आहे. सध्या माझे चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. लवकरात लवकर या चित्रपटाच्या पटकथेवरील काम पूर्ण होईल असे मला वाटतेय. या वर्षाच्या अखेरीपर्यंत आम्ही चित्रप़टाच्या चित्रीकरणाला सुरुवात 
देखील करणार आहोत. 

Web Title: Rohit Shetty's Marathi film will be shot soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.