साता जन्माची देवा पुण्याई...; अजय-अतुलबरोबर पहिल्यांदाच लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर भारावला रोहित राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 09:43 AM2024-04-08T09:43:45+5:302024-04-08T09:44:47+5:30

रोहितने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल गोगावले यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खास पोस्ट लिहिली आहे.

rohit raut felt over whelming performed live with ajay atul gogawale shared special post | साता जन्माची देवा पुण्याई...; अजय-अतुलबरोबर पहिल्यांदाच लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर भारावला रोहित राऊत

साता जन्माची देवा पुण्याई...; अजय-अतुलबरोबर पहिल्यांदाच लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर भारावला रोहित राऊत

रोहित राऊत हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक आहे. आपल्या सुमधूर आवाजाने रोहित प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. त्याने आजवर अनेक सुपरहिट गाण्यांना त्याचा आवाज दिला आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्समधून लोकप्रियता मिळवलेल्या रोहितने त्याच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. रोहित सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही रोहित चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असतो. नुकतंच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल गोगावले यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खास पोस्ट लिहिली आहे. "साता जन्माची देवा पुण्याई लागली आज पणाला...या दोन दिग्गजांबरोबर मी तब्बल ४ दिवस वेळ घालवला यावर माझा अजून विश्वास बसत नाहीये. स्टेजवर त्यांची सदाबहार गाणी गाऊन मी माझं करिअर घडवलं आहे. देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि माझं मोठं स्वप्न पूर्ण झालं. मला अजय-अतुल सरांबरोबर NMCC च्या स्टेजवर लाइव्ह गायची संधी मिळाली. धीमाही या गाण्याचा पहिल्यांदा सराव करण्यापासून ते काल अजय आणि अतुल दादांबरोबर ते गाणं गाण्यापर्यंत एक वर्तुळ पूर्ण झालं," असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

रोहितच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रोहितने गायिका जुईली जोगळेकरशी लग्न करत संसार थाटला आहे. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. 

Web Title: rohit raut felt over whelming performed live with ajay atul gogawale shared special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.