मकरंद माने दिग्दर्शित नव्या चित्रपटात रिंकू राजगुरू लवकरच रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 10:56 IST2017-10-23T04:34:41+5:302017-10-23T10:56:26+5:30
"मराठीत सांगितलेलं कळत न्हाय, इंग्लिशमध्ये सांगू" असं म्हणत तमाम सिनेरसिकांना अक्षरक्षः वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु. सैराट सिनेमातील ...
.jpg)
मकरंद माने दिग्दर्शित नव्या चित्रपटात रिंकू राजगुरू लवकरच रसिकांच्या भेटीला
"म राठीत सांगितलेलं कळत न्हाय, इंग्लिशमध्ये सांगू" असं म्हणत तमाम सिनेरसिकांना अक्षरक्षः वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु. सैराट सिनेमातील तिच्या अभिनयाने रसिकांवर जादू केली.सैराटमध्ये परशासोबत तिची रोमँटिक केमिस्ट्री,तिचा तितकाच बेधडक अंदाज, बुलेटच नाही तर ट्रॅक्टरही लिलया चालवणं सारं काही रसिकांवर जादू करुन गेलं.तिच्या अभिनयाचं कौतुक रसिकांसह समीक्षकांनीही केलं.इतकंच नाही तर तिला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कासुद्धा प्रदान करण्यात आला.पहिल्याच सैराट या सिनेमामुळे रिंकूने तमाम नायिकांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं. सैराटच्या यशामुळे रातोरात स्टार बनलेल्या या अकलुजच्या कन्येकडे विविध ऑफर्स आल्या.मात्र दहावीच्या परीक्षेमुळे ती या ऑफर्स स्वीकारु शकली नाही. सैराटमधील तिचा जोडीदार परशा म्हणजेच आकाश ठोसर दुस-या मराठी सिनेमात झळकला.रिंकू मात्र सैराटच्या कन्नड रिमेकशिवाय दुसरीकडे कुठेही झळकली नाही. त्यामुळं रिंकू मराठी सिनेमातून पुन्हा कधी भेटीला येणार याची रसिकांना उत्सुकता लागली होती.अखेर रसिकांची प्रतीक्षा संपली असून आर्ची फेम रिंकू तिच्या दुस-या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.नुकतंच दिवाळीच्या मुहूर्तावर रिंकूच्या फॅन्सना या सिनेमाच्या घोषणेच्या निमित्ताने मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे.रिंगण या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या सिनेमाचा दिग्दर्शक मकरंद मानेच्या आगामी सिनेमात रिंकू झळकणार आहे.यांत रिंकूची प्रमुख भूमिका असेल.दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमाचं नाव मात्र अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. सगळ्यांना भावेल असं या सिनेमाचं कथानक असेल.
चित्रपटाविषयी माहिती देताना मकरंद म्हणाला,'आपण जेव्हा एखाद्या कथेची मांडणी करत असतो,तेव्हा त्यातील पात्र असू देत किंवा इतर गोष्टी या चित्र स्वरूपात आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानुसार त्या सर्व बाबींचा शोध सुरू होतो.रिंकूच्या रूपाने या कथेच्या नायिकेचा शोध पूर्ण झाला.चित्रपटाची गोष्ट ऐकून तिनंही तत्काळ चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला.तिनं या चित्रपटात काम करणं ही आमच्या टीमसाठी आनंदाची बाब आहे.' 'मकरंदचा रिंगण हा चित्रपट आम्ही पाहिला होता.त्याची गोष्ट सांगण्याची पद्धत विलक्षण आहे.त्याला चित्रपट हे माध्यम नेमकं माहीत आहे.त्यामुळे त्यानं या चित्रपटाचं कथानक ऐकवल्यावर आम्हाला ते आवडलं.आजुबाजूला घडणारं वातावरण संवेदनशील पद्धतीनं या चित्रपटात मांडलं जाणार आहे,'असं निर्माते सुधीर कोलते यांनी सांगितलं.