रिंकू राजगुरूने 'या' मराठी अभिनेत्याला बांधली राखी; 'खारी बिस्किट अन् रक्षाबंधन स्पेशल' म्हणत शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:20 IST2025-08-22T17:14:35+5:302025-08-22T17:20:14+5:30

लोकप्रिय मराठी अभिनेत्याने रिंकू राजगुरूकडून बांधली राखी; रक्षांबधनाचे फोटो आले समोर

Rinku Rajguru Tied A Rakhi Marathi Actor Siddharth Jadhav Shared Photo Late Raksha Bandhan Celebration | रिंकू राजगुरूने 'या' मराठी अभिनेत्याला बांधली राखी; 'खारी बिस्किट अन् रक्षाबंधन स्पेशल' म्हणत शेअर केले फोटो

रिंकू राजगुरूने 'या' मराठी अभिनेत्याला बांधली राखी; 'खारी बिस्किट अन् रक्षाबंधन स्पेशल' म्हणत शेअर केले फोटो

Rinku Rajguru Raksha Bandhan Celebration: गेल्या ८ ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला. चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी देखील हा सण साजरा केला. त्यात काही असे भाऊ–बहिणी आहेत, जे रक्ताच्या नात्याने जुळलेले नसले तरीही एकमेकांसाठीची आपुलकी आणि माया यामुळे ते 'मानलेले भाऊ–बहिण' म्हणून ओळखले जातात. अशीच एक मराठी फिल्म इंडस्ट्रीतील भाऊ – बहिणीची जोडी म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). या दोघांच्या रक्षांबधनाचे फोटो समोर आले आहेत. 

सिद्धार्थ जाधवनं काल त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिंकू राजगुरूसोबतचे फोटो शेअर केले. ज्यातील एका फोटोत त्यानं राखी बांधलेला हात दाखवला आणि कॅप्शनमध्ये लिहलं, "रिंकू राजगुरू ताई... #खारीबिस्किट". दुसऱ्या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. या फोटोला सिद्धार्थनं फोटोला "#खारीबिस्किट #रक्षाबंधनस्पेशल" असं कॅप्शन दिलं.  या फोटोंमध्ये रिंकू आणि सिद्धार्थ दोघेही सिंपल लूकमध्ये दिसले. सिद्धार्थनं शेअर केलेले हे फोटो रिंकूनंही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. 

सिद्धार्थ आणि रिंकू यांचे रक्षाबंधनाचे फोटो पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. अनेकांना रिंकू आणि सिद्धार्थ यांच्यातील हे भावाबहिणीचे नाते माहीत नव्हते. त्यामुळे हे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ जाधव हे दोघेही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आगामी 'साडे माडे तीन २' या सिनेमात हे दोघं एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू हे दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि यशस्वी कलाकार आहेत. 
 

Web Title: Rinku Rajguru Tied A Rakhi Marathi Actor Siddharth Jadhav Shared Photo Late Raksha Bandhan Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.