रिंकू राजगुरूसोबत दिसत असलेले हे बाळ आहे तरी कोण? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:06 PM2021-03-01T16:06:04+5:302021-03-01T16:09:48+5:30

रिंकूच्या हातात एक चिमुकले बाळ असून ती बॉटलने या बाळाला दूध पाजताना दिसत आहे.

rinku rajguru shares video with nephew on social media | रिंकू राजगुरूसोबत दिसत असलेले हे बाळ आहे तरी कोण? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

रिंकू राजगुरूसोबत दिसत असलेले हे बाळ आहे तरी कोण? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देरिंकूने या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे हे बाळ कोण आहे हे आपल्याला कळत आहे. तिने कॅप्शन लिहिले आहे की, बालपणासारखं सुख नाही आणि नेफ्यू अँड आंटी टायमिंग असा या फोटोसोबत हॅशटॅग तिने लिहिला आहे. यावरून हे बाळ तिचा भाचा असल्याचे आपल्याला कळून येत आहे. 

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कारण या व्हिडिओत आपल्यासोबत एक छोटेसे बाळ पाहायला मिळत आहे. 


रिंकूच्या हातात एक चिमुकले बाळ असून ती बॉटलने या बाळाला दूध पाजताना दिसत आहे. रिंकूने या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे हे बाळ कोण आहे हे आपल्याला कळत आहे. तिने कॅप्शन लिहिले आहे की, बालपणासारखं सुख नाही आणि नेफ्यू अँड आंटी टायमिंग असा या फोटोसोबत हॅशटॅग तिने लिहिला आहे. यावरून हे बाळ तिचा भाचा असल्याचे आपल्याला कळून येत आहे. 

रिंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ पाच तासांत 62 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून बाळ देखील रिंकूप्रमाणे गोड असल्याचे तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

रिंकूचा लूक गेल्या काही महिन्यात चांगलाच बदलला असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ती गेल्या काही महिन्यात अधिक ग्लॅमरस झाली आहे. तसेच ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली असून दररोज एक तरी फोटो ती पोस्ट करत आहे.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: rinku rajguru shares video with nephew on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.