VIDEO : रिंकू राजगुरूचा मराठमोळा अंदाज पाहून चाहते म्हणताहेत - 'याड लागलं गं..!'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 07:00 AM2021-01-16T07:00:00+5:302021-01-16T07:00:00+5:30

रिंकू राजगुरूच्या साडीतील लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

Rinku Rajguru shared photos and videos in Saree | VIDEO : रिंकू राजगुरूचा मराठमोळा अंदाज पाहून चाहते म्हणताहेत - 'याड लागलं गं..!'

VIDEO : रिंकू राजगुरूचा मराठमोळा अंदाज पाहून चाहते म्हणताहेत - 'याड लागलं गं..!'

googlenewsNext

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर साडीतील फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. या साडीतील रिंकू राजगुरूचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांना खूप भावला आहे.

रिंकू राजगुरूने साडीतील फोटो शेअर करत लिहिले की, साडी ही शाश्वत फॅशन आहे. रिंकूने ही साडी मकर संक्रांतीच्या निमित्ताने नेसली होती. तिच्या साडीतील फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

इतकेच नाही तर या साडीतील एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. तिचे साडीतील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.

या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Rinku Rajguru shared photos and videos in Saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.