विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीचा आढावा माहितीपटामधून उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 13:26 IST2017-03-28T07:44:26+5:302017-03-28T13:26:37+5:30

चेह-यावरील हावभाव, डोळ्यातून व्यक्त होणा-या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे कलाकार म्हणजे अभिनेता ...

Review of Vikram Gokhale's career will be revealed through the draftsman | विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीचा आढावा माहितीपटामधून उलगडणार

विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीचा आढावा माहितीपटामधून उलगडणार

ह-यावरील हावभाव, डोळ्यातून व्यक्त होणा-या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे कलाकार म्हणजे अभिनेता विक्रम गोखले. सशक्त, गंभीर भूमिका साकारणारा दर्जेदार कलावंत म्हणून नावलौकिक मिळवणारे अभिनेता म्हणजे विक्रम गोखले.मराठी सिनेमा आणि रंगभूमी गाजवणा-या या कलाकाराने हिंदीतही वेगळी छाप पाडली आहे.आवाजावरील विलक्षण पकड, डोळे आणि मुद्राभिनय तसंच देहबोलीचा अचूक वापर करणारा एक अवलिया म्हणजे विक्रम गोखले. घरातूनच त्यांना अभिनयाचा वारसा लाभला.त्यांच्या रक्तातच अभिनय भिणलेला आहे. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बालकलाकार तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि सिनेमातील एक गाजलेलं नाव. गेली शंभर वर्षे जुनी परंपरा असणा-या गोखले कुटुंबीयांचे विक्रम गोखले हे महत्त्वाचे शिलेदार आहेत. मात्र स्वकर्तृत्वावर ठाम विश्वास असणा-या विक्रम गोखले यांनी स्वतःच्या अभिनय क्षमतेच्या जोरावर अभिनयाक्षेत्रात नवी उंची गाठली आहे. मराठी हिंदी सोबतच त्यांनी गुजराती भाषेतही काम करत आपल्यातील कलावंतला अधिक प्रगल्भ केले.अभिनयाच्या क्षेत्रात वावरत असताना विक्रम गोखले यांनी सामाजिक बांधिलकीही जपली.अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी त्यांनी केलेलं कार्यसुद्धा वाखाणण्याजोगं आहे.त्यामुळे विक्रम गोखले या कलावंताच्या अभूतपूर्व अशा या कारकिर्दीचा आढावा लवकरच एका माहितीपटामधून घेतला जाणार आहे.

अभिनय क्षेत्राची तब्बल ५० वर्ष अविरत सेवा करताच त्यांनी दुसरीकडे सामाजिक बांधिलकीचा वसा देखील जपला. अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी वडील चंद्रकात गोखले यांसोबत गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करीत आहे. अशा या मातब्बर नटश्रेष्टाच्या कारकीर्दीचा आढावा लवकरच माहितीपटातून घेतला जाणार आहे. थीम्स अनलिमिटेड आणि इंडियन फिल्म स्टुडियोच्या बेनरखाली ह्या माहितीपटाचे चित्रीकरण होत असून, योगेश सोमण, आशिष वाघ आणि उत्पल आचार्य या तीन निर्मात्यांची फक्कड तिकडी याला लाभली आहे, तसेच या माहितीपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक वाघ करीत आहेत.शेखर ढवळीकर लिखित या माहितीपटातून विक्रम गोखले यांच्या अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द रसिकांसमोर सादर केली जाणार आहे, या माहितीपटाबरोबरच विक्रम गोखले यांच्या आयुष्यातील महत्वाच्या लोकांकडून त्यांचा जीवनप्रवास देखील कथित केला जाईल, शिवाय, खुद्द विक्रम गोखले देखील आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करताना दिसतील. अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले या विक्रमी कलावंताचा हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Review of Vikram Gokhale's career will be revealed through the draftsman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.