वजनदारसाठी सईने पार पाडली 'ही' जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 17:32 IST2016-10-28T17:32:31+5:302016-10-28T17:32:31+5:30

 काकूबाई पर्णरेखा, जाऊंद्याना बाळासाहेबमधली गावरान भाषा बोलणारी आणि कुंभार काम करणारी करिष्मा किंवा फॅमिली कट्टा मधली धीर गंभीर मंजू ...

This 'responsibility' responsibility for the heavy weight has been fulfilled | वजनदारसाठी सईने पार पाडली 'ही' जबाबदारी

वजनदारसाठी सईने पार पाडली 'ही' जबाबदारी

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> काकूबाई पर्णरेखा, जाऊंद्याना बाळासाहेबमधली गावरान भाषा बोलणारी आणि कुंभार काम करणारी करिष्मा किंवा फॅमिली कट्टा मधली धीर गंभीर मंजू ही प्रत्येक भूमिका सईने वजनदारपणे निभावली आहे. आता सई वजनदार चित्रपटातून एक पाऊल पुढे टाकत एक जबाबदार अभिनेत्री म्हणून आपल्या भूमिके पलीकडे  जाऊन पडद्या मागील कामात व्यग्र होती.  शूटमधून 3 दिवसाचा ब्रेक मिळालेला असताना देखील आराम किंवा भटकंती न करता सईने तिचा संपूर्ण वेळ वजनदारच्या सेट वरच घालवला. आपली भूमिका आणि चित्रपट कसा सोईस्कर रित्या पूर्ण होऊ शकतो याचा जाणीवपूर्वक विचार करत सईने सहाय्यक दिग्दर्शकाचे काम हाती घेतले होते. शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या व्यवस्थितच असल्या पाहिजे असा दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा अट्टाहास असायचा, त्यामुळे आर्ट डिरेक्शन टीमला असिस्ट करण्याचे काम सईने केले आहे. तसेच फ्रेम सुंदर दिसण्यासाठी ज्या वस्तू आवश्यक असतात त्या वेळेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारीदेखील सईने उत्तमरित्या पार पाडली. त्याचसोबत रोज पॅक-अप झाल्यानंतर सई सहाय्यक दिग्दर्शकसोबत बसून पुढील दिवसाचे शेड्युलदेखील ठरवित असे, तसेच राहिलेले सीन्स वेळेत कसे पूर्ण करता येतील यावर मार्ग काढत असे. इतकंच नव्हे तर जेव्हा सई सोडून बाकीच्या कास्टचे शूटिंग चालू असायचे तेव्हाही सई सहाय्यक दिग्दर्शकासोबत वॉकी टॉकी घेऊन सेटवर सूचना देत असे. सईला पडद्या मागच्या भूमिकेत पाहून शूटिंग बघायला आलेल्या लोकांचा उडालेला गोंधळ उडाला होता. याबद्दल सई सांगते, शूटिंग पाहायला आलेले सर्वजण मला पडद्यामागे बघून खूपच आश्चर्यचकित झाले होते. पण पडद्यामागे काम करताना मला कळले कि ही सर्व कामे करताना किती संयम लागतो. कलाकारांच्या टँट्रम्समुळे सेटवरील कामावर कसा आणि किती परिणाम होतो. त्यावेळी पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची भावना काय असते हे मला कळले. आर्ट डिरेक्शन असो किंवा सहाय्यक  दिग्दर्शकाचे काम करताना एक नवीन अनुभव मिळाला असल्याचे देखील सईने यावेळी सांगितले. 

Web Title: This 'responsibility' responsibility for the heavy weight has been fulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.