‘हृदयांतर’ सिनेमाचे पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 17:10 IST2017-05-10T11:40:53+5:302017-05-10T17:10:53+5:30

'बॉलिवूडचा हँडसम हंक' म्हणून ओळखल्या जाणा-या हृतिक रोशनने सोशल नेटवर्किंग साइटवरून‘हृदयांतर’ चित्रपटाची रिलीज डेट 9 जून 2017 असल्याचं जाहिर ...

Release of poster of 'heart-time' film, posthumous expiry date | ‘हृदयांतर’ सिनेमाचे पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

‘हृदयांतर’ सिनेमाचे पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

'
;बॉलिवूडचा हँडसम हंक' म्हणून ओळखल्या जाणा-या हृतिक रोशनने सोशल नेटवर्किंग साइटवरून‘हृदयांतर’ चित्रपटाची रिलीज डेट 9 जून 2017 असल्याचं जाहिर केले होते.मात्र काही कारणामुळे हा सिनेमा लांबणीवर पडला आहे. होय, 9 जून ऐवजी हा सिनेमा आता 7 जुलैला रिलीज करायचा निर्णय घेण्यात आला आहे. फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस आपल्या पहिल्या मराठी फिल्म ‘हृदयांतर’व्दारे लेखक-दिग्दर्शक-निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. विक्रमच्या भावनात्मक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’ सिनेमाचे पोस्टर मंगळवारी रिलीज झाले. विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.फिल्ममेकर्सनी या चित्रपटाची तारीख अगोदर 9 जून निश्चित केली होती. पण आता ही फिल्म एक महिन्यानंतर म्हणजेच 7 जुलै 2017ला चित्रपटगृहात झळकणार आहे.याविषयी निर्माता-दिग्दर्शक विक्रम फडणीस म्हणतो, “ही फिल्म मोठ्यांनीच नाही तर लहान मुलांनीही पाहाता यावी, हा कौटुंबिक भावनात्मक  चित्रपट आहे. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी त्यांच्या मुलांसह हा चित्रपट पाहावा. जून महिना लागतचा शाळा सुरू होतील त्यातच सगळे बिझी असतील त्यामुळे सगळे रसिक त्यांच्या धावपळीतून निवांत होतील तेव्हाच हा चित्रपट  7 जुलैला रिलीज करायचा निर्णय घेतलाय.”सुपरस्टार हृतिर रोशन आणि टेलिविजन होस्ट मनिष पॉलच्या ही चित्रपटात विशेष भूमिका असून  मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.सगळ्यांत विशेष म्हणजे  खुद्द बॉलिवूडचा हँडसम हंक' हृतिक रोशनही या चित्रपटात पाहूणा कलाकराच्या भूमिकेत झळकणार आहे. 

Web Title: Release of poster of 'heart-time' film, posthumous expiry date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.