आकाश ठोसर कोणत्या कारणामुळे नाराज आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 10:48 IST2016-11-13T13:17:10+5:302016-11-14T10:48:29+5:30

एखादा चित्रपट हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. काही दिवसांनी तो चित्रपट बॉक्सआॅफिसवर करोडोचा गल्ला ही कमवितो. त्याचबरोबर त्या चित्रपटाची कथा, ...

The reason is that the sky is upset due to the toss? | आकाश ठोसर कोणत्या कारणामुळे नाराज आहे?

आकाश ठोसर कोणत्या कारणामुळे नाराज आहे?

ादा चित्रपट हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. काही दिवसांनी तो चित्रपट बॉक्सआॅफिसवर करोडोचा गल्ला ही कमवितो. त्याचबरोबर त्या चित्रपटाची कथा, अभिनेता, अभिनेत्री, गाणी सर्व काही प्रेक्षकांना भावते. त्यामुळे त्या चित्रपटाप्रमाणेच त्यातील अभिनेता व अभिनेत्रीदेखील हीट होतात. मात्र त्या चित्रपटाच्या पडदयामागील कलाकारांची मेहनत ही कधीच प्रेक्षकांसमोर येत नाही. म्हणून पडदयामागच्या या कलाकारांच्या मेहनतीची जाणीव अभिनेता आकाश ठोसर याला झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकतेच आकाशने त्याची ही खंत सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. त्याने सोशल मीडियावर कॅमेरासहित एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तो कॅमेरामागची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तो आपल्या स्टेटसच्या माध्यमातून सांगतो, कॅमेरामागची जी मेहनत असते ना, खरंच त्याचे शब्दांत वर्णन करणे खूप कठीण आहे. आकाशच्या या विचारांना सोशल मीडियावर देखील दुजोरा मिळताना दिसत आहे. तसेच त्याचा हा फोटोदेखील सोशल मीडियावर हिट होताना दिसत आहे. सोशल मीडियावरचा त्याचा हा फोटो एफयू या चित्रपटाच्या सेटवरचा असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले आहे. तो महेश मांजरेकर यांच्या एफयू या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्याच्यासोबत या चित्रपटात सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे आदि कलाकार पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी त्याची सैराट या चित्रपटातील परशाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर त्याच्या या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातदेखील सैराटमय वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे आकाशची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असल्याचे दिसून येते. 
 

Web Title: The reason is that the sky is upset due to the toss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.