या कारणामुळे माधुरीची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 16:31 IST2017-12-02T11:01:02+5:302017-12-02T16:31:02+5:30

मराठमोळी अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे रसिकांची मनं जिंकली आहेत.आपला अभिनय,आपलं घायाळ करणारं हास्य, ...

For this reason, Madhuri's first Marathi movie is postponed? | या कारणामुळे माधुरीची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा लांबणीवर?

या कारणामुळे माधुरीची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा लांबणीवर?

ाठमोळी अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे रसिकांची मनं जिंकली आहेत.आपला अभिनय,आपलं घायाळ करणारं हास्य, आपल्या दिलखेचअदा, नृत्य याने माधुरीने रसिकांवर मोहिनी घातली.हिंदी चित्रपटसृष्टीत एक आघाडीची अभिनेत्री असं स्थान माधुरीने अनेक वर्ष जपलं.माधुरीने लग्नानंतर आपली नवी इनिंग हिंदी चित्रपटसृष्टीत सुरु केली. लग्नानंतरही तिची जादू काही कमी झाली नाही.याशिवाय विविध डान्स रिअॅलिटी शोच्या जजच्या भूमिकेतही माधुरी पाहायला मिळाली.आता रसिकांची लाडकी माधुरी नवी इनिंग सुरु करत आहे. माधुरी लवकरच निर्माती म्हणून नवी इनिंग सुरु करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या या नव्या इनिंगबाबत उत्सुकता आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरु होणार होतं. मात्र आता निर्माती म्हणून माधुरीच्या या भूमिकेची रसिकांना वाट पाहावी लागणार आहे. कारण या सिनेमाचं दिग्दर्शन करणा-या स्वप्नील जयकरला छोटा अपघात झाला आहे. या अपघातात स्वप्नीलचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यामुळे माधुरीची निर्मिती असलेल्या या बहुप्रतिक्षित सिनेमाचं शूटिंग लांबणीवर पडलं असून शूटिंग शेड्युअल पुढे ढकलण्यात आले आहे. याआधी स्वप्नील जयकर याने 'तेंडुलकर आऊट' या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. यानंतर माधुरीच्या बड्या आणि महत्त्वाकांक्षी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वप्नीलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर रोहन मापुस्करवर या सिनेमाच्या कास्टिंगची धुरा सोपवण्यात आली आहे. तूर्तास तरी स्वप्नीलच्या छोट्या अपघातादरम्यान पाय फ्रॅक्चर झाल्याने माधुरीची निर्मिती असलेल्या सिनेमाची रसिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी या चित्रपटाची कथा खूपच चांगली आणि हटके असल्याचे बोलले जात आहे.
Also Read:माधुरी दिक्षितच्या फॅन्ससाठी खुशखबर.... माधुरी झळकणार या मराठी चित्रपटात

कलेला कोणत्याही भाषेचे बंधन नसते असे मानणारी माधुरी आहे. मराठी चित्रपटात काम करण्यासाठी माधुरी प्रचंड उत्सुक आहे. तिच्या या चित्रपटाविषयी माधुरी सांगते, प्रत्येक घरात घडणारी गोष्ट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा तुम्हाला केवळ आशा देणार नाही तर या कथेतून तुम्हाला एक प्रेरणा देखील मिळणार आहे. आयुष्य खऱ्या अर्थाने कसे जगायचे हे हा चित्रपट प्रेक्षकांना शिकवणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या खूप वेगळे आणि चांगले विषय आपल्याला पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपट करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मी गेल्या काही वर्षांत अनेक पटकथा देखील वाचल्या आहेत. पण कोणतीच पटकथा मला तितकीशा भावत नव्हती. पण ही पटकथा वाचल्यावर काहीच क्षणात मला हा चित्रपट करायचाच आहे हा निर्णय मी घेतला. या चित्रपटाची टीम खूपच चांगली असल्याचे माधुरीने सांगितले.

Web Title: For this reason, Madhuri's first Marathi movie is postponed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.