या कारणामुळे बॉलिवूडचा दिग्दर्शक मराठी सिनेमाची लिहणार ‘कहानी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 06:07 AM2017-12-22T06:07:31+5:302017-12-22T11:37:31+5:30

बॉलिवूडच्या मंडळींचं मराठी प्रेम काही लपून राहिलेलं नाही.मराठी सिनेमाची दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहून बॉलिवूडकर चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यामुळे ...

For this reason, the Bollywood director will write 'Kahaani' written by Marathi cinema. | या कारणामुळे बॉलिवूडचा दिग्दर्शक मराठी सिनेमाची लिहणार ‘कहानी’!

या कारणामुळे बॉलिवूडचा दिग्दर्शक मराठी सिनेमाची लिहणार ‘कहानी’!

googlenewsNext
लिवूडच्या मंडळींचं मराठी प्रेम काही लपून राहिलेलं नाही.मराठी सिनेमाची दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहून बॉलिवूडकर चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मराठी सिनेमात काम करण्यासाठी आतुर असतात. याशिवाय अनेक प्रसिद्ध आणि गाजलेल्या मराठी सिनेमांचे आता हिंदीतही रिमेक बनू लागले आहेत.बॉलिवूडच्या या मंडळींपैकी एक प्रसिद्ध आणि गाजलेलं नाव म्हणजे सुजॉय घोष यालाही आता मराठी प्रेमाचं भरतं आलं आहे.त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अशी ओळख असलेला सुजॉय घोष आता मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री मारणार आहे.एका मराठी सिनेमाची पटकथा सुजॉय घोष लिहणार असल्याचे लयभारी अभिनेता आणि निर्माता रितेश देशमुख याने ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. या ट्विटसह रितेशनं सुजॉय घोषचा फोटोही शेअर केला होता.“या सज्जन माणसाला मी कॉफीवर भेटलो आणि एका मराठी सिनेमासाठी पटकथा लिहणार असल्याचे वचन त्याने दिले“ अशी कॅप्शनही रितेशनं या ट्विटला दिली होती.सुजॉयनेही रितेशच्या या ट्विटला प्रतिक्रिया दिली होती.सुजॉयने 2003 साली 'झंकार बीट्स' या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शनाच्या आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. त्यानंतर 2009 साली सुजॉयने रितेश देशमुखच्या अलाद्दीन या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही.मात्र यानंतरही सुजॉयनं हार मानली नाही.त्यामुळेच कहानी, कहानी-2, टीई3एन या सुजॉयनं दिग्दर्शित केलेल्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.दुसरीकडे रितेश देशमुख अभिनयासह निर्मात्याची भूमिकाही यशस्वीरित्या सांभाळत आहे. बालक पालक, लय भारी, फास्टर फेणे अशा सिनेमांच्या माध्यमातून मराठी सिनेमाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यात रितेश मोलाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे सुजॉय आणि रितेश मराठी सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येत नवा चमत्कार करणार का याकडं आता रसिकांच्या नजरा लागल्या आहेत.




Also Read: आपल्या मुलांसाठी रितेश देशमुखचे हे ‘लयभारी’ काम,वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

2007 साली दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी धमाल हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आणला. 2011 साली याच सिनेमाचा सिक्वेल डबल धमाल हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला. आता या सीरिजच्या तिस-या सिनेमाच्या रुपात इंद्र कुमार टोटल धमाल नावाचा सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या सिनेमात अभिनेता संजय दत्तऐवजी अजय देवगण झळकणार आहे.

Web Title: For this reason, the Bollywood director will write 'Kahaani' written by Marathi cinema.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.