संग्रामचा वास्तववादी शिवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 10:50 IST2016-03-21T17:50:22+5:302016-03-21T10:50:22+5:30

         शेतकºयांची आत्महत्या हा एक गंभीर विशय असुन मनाला पटकन चटका लावुन जातो.  या विषयावर अनेक ...

The realistic shire of the struggle | संग्रामचा वास्तववादी शिवार

संग्रामचा वास्तववादी शिवार


/>         शेतकºयांची आत्महत्या हा एक गंभीर विशय असुन मनाला पटकन चटका लावुन जातो.  या विषयावर अनेक भावस्पर्शी चित्रपट येऊन गेले आहेत. असाच अजुन एक विषय शिवार या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला तुमच्या साठी काय पण म्हणुन तमाम प्रेक्षकांना वेड लावणारा रांगडा अभिनेता संग्राम साळवी पहायला मिळणार आहे. संग्रामने आत्तापर्यंत ग्रामीण बाज असलेले रोल केले असले तरी या चित्रपटामध्ये तो इंजिनिअरिंगची डिगरी घेतलेल्या वेल एज्युकेटेड तरुणाची भुमिका साकारतोय. 
           सीएनएक्सशी या चित्रपटाबद्दल बोलताना संग्राम सांगतोय, शिवार ही शेतकºयाच्या आत्महत्येची कहाणी जरी असली तरी यामध्ये शेतकरी आत्महत्या का करतात हे कारण शोधण्यासाठी त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये नागेश भोसले माझ्या वडीलांची भुमिका साकारत आहेत. मुलगा इंजिनिअर असुन त्याला बिझनेस करायचाय पण वडिलांना ते मान्य नाही आणि त्यामुळे होणारे वडील मुलाच्या नात्यातील क्लेष देखील यामध्ये दाखविण्यात आले आहेत. संग्रामचा हा वास्तववादी सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना भावेल अशी आपण आशा करुयात.      

Web Title: The realistic shire of the struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.