हंसराजच्या फॅन्ससाठी खूशखबर जाणून घेण्यासाठी वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:20 IST2016-11-11T16:02:19+5:302016-11-11T16:20:02+5:30

बीडसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या हंसराज जगताप या बालकलाकाराने अत्यंत कमी वयात आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले. 'धग' या सिनेमात ...

Read on to know the good news for Hansraj's fans. | हंसराजच्या फॅन्ससाठी खूशखबर जाणून घेण्यासाठी वाचा..

हंसराजच्या फॅन्ससाठी खूशखबर जाणून घेण्यासाठी वाचा..

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">बीडसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या हंसराज जगताप या बालकलाकाराने अत्यंत कमी वयात आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले. 'धग' या सिनेमात किसन्याची भूमिका साकारून अभिनयात आपले नाव सार्थ ठरविले. धग या चित्रपटातील अभिनयासाठी हंसराजला सर्वोत्कृष्ट बालकलाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  अभिनयाइतकचं क्रिकेट आणि डान्सचेही त्याला वेड आहे. आपल्या चित्रपटाच्या बिझी शेड्यूलमधून क्रिकेट तसेच डान्ससाठी तो आवर्जुन वेळ काढतो.  हंसराजची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्याच्या आईने त्याला डान्सच्या क्लास घातले. आतापर्यंत 200 ते 250 बक्षिस त्याला नृत्यासाठी मिळाली आहेत. आपल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणा-या हंसराजने सिनेसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. फुटबॉल तसेच बास्केटबॉल या खेळातचीही आवड आहे. राखणदार, स्लॅमबुक, मनातल्या उन्हात, यारी दोस्ती यांसारख्या सिनेमांमधून आपल्याला त्याचे अभिनय कौशल्य पाहायला मिळाले आहे. 'आयटमगिरी' या सिनेमात हंसराज एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राजेश्वरी खरात पाहायला मिळणार आहे. अशा या ऑलराऊंडर  हंसराजचे पांजरपोळ, जांभुळभेट, झिप-या, गजा तसेच संस्कृती हे आगामी सिनेमे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. तसेच आता आयटमगिरी या आगामी चित्रपटात हंसराज आणि राजेश्वरी खरात ही हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Read on to know the good news for Hansraj's fans.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.