रवी जाधव घेतोय 'या' आजोबांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:19 IST2016-11-11T15:04:57+5:302016-11-11T16:19:29+5:30

  रवी जाधव यांचे अनेक सिनेमे वेगळ्या विषयांवर प्रकाश टाकणारे असतात. दिग्दर्शन आणि निर्मिती बरोबरच रवी आता अभिनयात क्षेत्रातही ...

Ravi Jadhav is searching for the grandfather's research | रवी जाधव घेतोय 'या' आजोबांचा शोध

रवी जाधव घेतोय 'या' आजोबांचा शोध

 <
div style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">रवी जाधव यांचे अनेक सिनेमे वेगळ्या विषयांवर प्रकाश टाकणारे असतात. दिग्दर्शन आणि निर्मिती बरोबरच रवी आता अभिनयात क्षेत्रातही पाऊल टाकणार आहे. दर्जेदार चित्रपट बनविणारा एखादा माणूस जर दुसऱ्या चित्रपटाचे भरभरुन कौतुक करीत असेल ते पण सगळ्या जगासमोर तर जरा आश्चर्य वाटेल ना ? पण हो तसे झाले आहे. रवी जाधवने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटाचे अगदी मनापासून कौतुक केले आहे. अहो एवढेच नाही तर रवीला त्या चित्रपटाती एका आजोबांना भेटायची इच्छा असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'व्हेंटिलेटर' या चित्रपटाकडे पाहुन एक चित्रपट काय करु शकतो याची प्रचिती नक्कीच येते.  संपूर्ण महाराष्ट्रात व्हेंटिलेटरला हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक सहकुटुंब येत आहेत. दिग्दर्शक राजेश मापुसकर, पात्र संयोजक रोहन मापुसकर, जितेंद्र जोशी, विजय निकम, भूषण तेलंग, आशा ज्ञाते यांनी नुकताच डोंबिवलीतील टिळक व मधुबन चित्रपटगृहात रसिकांबरोबर चित्रपट पाहिला. या ठिकाणी एक प्रेक्षक आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आपलं कुटुंब मोठं असलं तरी आपण फक्त कुटुंबातील कुणाच्या लग्नासाठी, कुणाचं निधन झाल्यानंतर आणि संपत्तीच्या वाटणीसाठीच तेवढे एकत्र येतो. या चित्रपटातील एक गंमत म्हणजे, संपूर्ण सिनेमामध्ये ज्या आजोबांसाठी सगळे एकत्र येतात ते कोण आहेत अशी उत्सुकता जशी सामान्य माणसाला लागली होती तशीच सिनेसृष्टीतील कलाकारांना सुद्धा लागली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सोशल मिडियावर कौतुकाचा जणू पाऊसच पडू लागला आणि त्यात ब-याच जणांना आजोबांना भेटायची इच्छा झाली आहे. आता रवी या आजोबांना कधी भेटणार हे आपल्याला लवकरच सोशल साईट्सवर समजेलच. 

Web Title: Ravi Jadhav is searching for the grandfather's research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.