तंत्रज्ञानानं साकारले 'रंगा पतंगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 08:22 IST2016-03-25T15:05:14+5:302016-03-25T08:22:53+5:30

आशयविषयानं समृद्ध असलेल्या मराठी चित्रपटाला तंत्रज्ञान एक पाऊल पुढे नेत आहे. व्हीएफएक्स तंत्रज्ञानानं तर क्रांती केली आहे. अनेक मराठी ...

'Ranganga Patanga' has been adapted by technology | तंत्रज्ञानानं साकारले 'रंगा पतंगा'

तंत्रज्ञानानं साकारले 'रंगा पतंगा'


/>आशयविषयानं समृद्ध असलेल्या मराठी चित्रपटाला तंत्रज्ञान एक पाऊल पुढे नेत आहे. व्हीएफएक्स तंत्रज्ञानानं तर क्रांती केली आहे. अनेक मराठी चित्रपटांत हे तंत्रज्ञान वापरलं जाऊ लागलं आहे. मात्र, रंगा पतंगा आशयविषयासह तंत्रज्ञानातही तितकाच सक्षम आहे. या चित्रपटात बैल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारले आहेत. फर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची त्यासाठी मदत घेण्यात आली आहे. व्हीएफएक्स तंत्रज्ञ अभिजित दरिपकरनं त्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. यापूर्वी हे तंत्रज्ञान लाइफ ऑफ पाय सारख्या चित्रपटांमध्ये वापरण्यात आलं होतं. 'चित्रपटात प्राण्यांचा वापर करण्यावर बंधन असल्यानं तंत्रज्ञान वापरण्याला पर्याय राहिलेला नाही. चित्रपटातील बैल हे मुख्य कॅरेक्टर असल्यानं दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांना तंत्रज्ञानाबाबत कोणतीही तडजोड नको होती. त्यामुळे माया अ‍ॅनिमेशनमधील फर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. या तंत्रज्ञानामुळे बैल अगदी खरेखुरे झाले आहेत,' असं अभिजितनं सांगितलं. 

Web Title: 'Ranganga Patanga' has been adapted by technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.