'रांची' डायरीज सिनेमातील ही अभिनेत्री आता मराठी सिनेमात झळकणार, आपल्या ‘सौंदर्या’ने रसिकांना करणार घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 13:47 IST2018-06-18T08:17:05+5:302018-06-18T13:47:05+5:30
मराठी सिनेमांनी गेल्या काही वर्षात तिकीट खिडकीवर धुमाकूळ घातलाय.आशयघन सिनेमा आणि दमदार कथानक सोबतीला कलाकारांचा तगडा अभिनय यामुळे मराठी ...

'रांची' डायरीज सिनेमातील ही अभिनेत्री आता मराठी सिनेमात झळकणार, आपल्या ‘सौंदर्या’ने रसिकांना करणार घायाळ
म ाठी सिनेमांनी गेल्या काही वर्षात तिकीट खिडकीवर धुमाकूळ घातलाय.आशयघन सिनेमा आणि दमदार कथानक सोबतीला कलाकारांचा तगडा अभिनय यामुळे मराठी सिनेमांनी नवी उंची गाठलीय. त्यामुळेच की बॉलिवूडसुद्धा मराठी सिनेमांच्या प्रेमात पडलं. मराठी सिनेमांचे हिंदी तसंच इतर भाषेत रिमेक बनू लागले आहेत.प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार असे बॉलिवूड कलाकार मराठी सिनेमांची निर्मिती करु लागले आहेत. इतकंच नाही तर काही बॉलिवूड कलाकारांना मराठी प्रेमाचं भरतं आलं असून ते मराठी सिनेमात अभिनयसुद्धा करत आहेत.नुकतेच धकधक गर्ल माधुरी दीक्षित,सुनील शेट्टी आणि तमन्ना झळकले. तर सयामी खेर 'माऊली' सिनेमात झळकणार आहे.आता याच यादीत आणखी एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीचे नाव जोडले जाणार आहे.रांची डायरीज सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री सौंदर्या शर्मा आता मराठी सिनेमात झळकणार आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात खुद्द सौंदर्याने याची माहिती दिली. मात्र ती कोणत्या मराठी सिनेमात झळकणार, तिची भूमिका काय असणार, ती कोणत्या अभिनेत्यासह स्क्रीन शेअर करणार हे गुलदस्त्यातच आहे. 'रांची डायरीज' या सिनेमात सौंदर्याने एका छोट्याशा शहरातील तरुणीची भूमिका साकारली होती. या सिनेमात तिच्यासोबत बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर आणि जिमी शेरगिलसुद्धा होते. या दिग्गजांसह काम करताना सौंदर्याने आपल्या अदा, सौंदर्य आणि अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. त्यामुळे आता तिच सौंदर्या कोणत्या मराठी सिनेमात झळकणार आणि तिची भूमिका काय असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.