अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन आहे खूप महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 12:12 IST2017-08-07T06:42:49+5:302017-08-07T12:12:49+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन अत्यंत महत्वाचे आहे. संदिप आणि संदेश ह्या दोन भावांच्या पाठची सोनाली लहानपणापासून दरवर्षी आपल्या भावांसोबत ...

Rakshabandhan is very important for actress Sonali Kulkarni | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन आहे खूप महत्वाचे

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन आहे खूप महत्वाचे

िनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन अत्यंत महत्वाचे आहे. संदिप आणि संदेश ह्या दोन भावांच्या पाठची सोनाली लहानपणापासून दरवर्षी आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजरा करते.सोनाली आपल्या भावांविषयी सांगते, “माझे भाऊ माझे मेन्टॉर आहेत. माझं पहिलं पुस्तक ‘सो कुल’ मी त्यांना डेडीकेट केलं होतं. आणि आता दूसरं पुस्तक जेव्हा येईल तेव्हा ते ही मी त्यांना डेडीकेट करणार आहे. ते दोघंही लहानपणापासूनच माझं अवघं विश्व आहेत.” रक्षाबंधन साजरं करण्याबाबत ती म्हणते, “संदिप परदेशांत राहतो.त्यामूळे दरवर्षी रक्षाबंधनाला भेटणं शक्य होत नाही.पण मी तिला इ-मेल पाठवायचे. त्यावेळी लिहायचे, की, तू तुझी मुलगी माहीला जेव्हा कडेवर घेशील तेव्हा माझी राखी तुला पोहोचली असे समजेन.”संदेशसोबत रक्षाबंधन साजरं करण्याच्या आठवणी खूपच मजेशीर असल्याचं ती सांगते, “संदेश आणि मी रक्षाबंधनाला भेटतोच. यंदाही मी पूण्याला एका समाजसेवी उपक्रमात व्यस्त आहे. पण तो उपक्रम आटपून त्याच्यासोबत रक्षाबंधन साजरं करायला मुंबईत परतणार आहे. मी चित्रपटसृष्टीत व्यस्त असल्यापासून रक्षाबंधन फारच धावत-पळत होतं. कधी माझ्या चित्रपटाच्या सेटवर, तर कधी एअरपोर्टवर, एकवर्षी तर आम्ही दोघं खूप व्यस्त असल्याने कारमध्येच रक्षाबंधन साजर केले होते.सोनालीचे दोघंही भाऊ खूप सुंदर गिफ्ट्स देतात, असं ती सांगते, “मला पुस्तक वाचायला खूप आवडतात. म्हणून संदेश दरवर्षी मला पुस्तकं देतं. त्याने दिलेली पुस्तक अनेकदा मला जगण्याचा नवा दृष्टीकोण देऊन जातात. मी लेखिकाही असल्याने, संदिप मला खूप सुंदर फाऊंटन पेन, नोटपॅड, फाइल्स अशी काही ना काही लेखनाशी निगडीत गिफ्ट्स देतो.”

Web Title: Rakshabandhan is very important for actress Sonali Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.