मृणाल कुलकर्णीच्या हस्ते " सिनेमा मसाला मिक्स " पुस्तकाचे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 20:09 IST2016-09-08T14:39:03+5:302016-09-08T20:09:03+5:30
पत्रकार लेखक दिलीप ठाकूर यांच्या " सिनेमा मसाला मिक्स " या नवीन पुस्तकाचे आज एका छोटेखानी समारंभात अभिनेत्री मृणाल ...

मृणाल कुलकर्णीच्या हस्ते " सिनेमा मसाला मिक्स " पुस्तकाचे प्रकाशन
ir="ltr" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">पत्रकार लेखक दिलीप ठाकूर यांच्या " सिनेमा मसाला मिक्स " या नवीन पुस्तकाचे आज एका छोटेखानी समारंभात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दिलीप ठाकूर यांचे हे चौतीसावे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी ‘दीवार’, ‘शोले’, ‘सागर’, ‘रंगीला’, ‘वास्तव’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ अशा आपल्या आवडत्या चित्रपटांवर प्रकाश टाकला आहे. पुस्तकात एकोणीस छायाचित्रांचाही समावेश आहे. नवचैतन्य प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. दिलीप ठाकूर यांची यापूर्वी ‘क्लॅप’, ‘आडपडदा’, ‘फिल्मी मसाला पापड’, ‘यादगार पल’, ‘पार्टी, अ.. अमिताभ’चा अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘सिनेमा मसाला मिक्स’या पुस्तकात काही चित्रपटांबद्दल काही वेगळे वाचायला मिळेल, असा विश्वास मृणालने विश्वास व्यक्त केला. ठाकूर यांची यापूवीर्ची पुस्तके मी वाचलीत असेही मृणालने म्हटले.