नाट्य भारूडद्वारे ध्वनीप्रदूषणविषयी जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 11:59 IST2017-01-12T11:59:11+5:302017-01-12T11:59:11+5:30
वाढते प्रदूषणाचे प्रमाण पाहता, प्रदूषण रोखण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती केली जाते. यासाठी विविध मार्गाचादेखील अवलंब केला जातो. यासाठी कलाकार, ...

नाट्य भारूडद्वारे ध्वनीप्रदूषणविषयी जनजागृती
व ढते प्रदूषणाचे प्रमाण पाहता, प्रदूषण रोखण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती केली जाते. यासाठी विविध मार्गाचादेखील अवलंब केला जातो. यासाठी कलाकार, सामाजिक व्यक्तीदेखील विविध मार्गाने ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सोशलमीडियाच्या माध्यमातूनदेखील ध्वनीप्रदूषणविष़यी जनजागृती करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, जागृकता निर्माण करण्यासाठी वेगळ्या अशा संदेशात्मक उपक्रमात जिल्हाधिकीरी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय-पुणे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी-पुणे आणि रंगभुमी कलाकार योगिनी पोफळे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटी सायलेंट सिटी पुणे सिटी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि संकर्षण कºहाडे यांनी केले. यावेळी जागरूकतेचा संदेश पोहचवणारे मनोरंजनपर नाट्य भारूडद्वारे प्रेक्षकांसमोर सादर केले. स्वामीनी कुलकर्णी यांनी हे नाटय आणि भारूद सादर केले. असा हा आगळा वेगळा सुरक्षा सप्ताह यावेळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कलाकार राहुल बेलापूरकर,आशुतोष वाडेकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मनुष्य आणि ध्वनी प्रदूषण यांचे समीकरण बदलतच चालले आहे. त्यामुळेच स्मार्ट शहर, शांत शहर सारख्या मोहिमांची गरज आढळून येताना दिसते. इतकेच नाही तर नो हॉर्न्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे संजय राऊत यांनी त्यांच्या अनुभवांचे कथनदेखील या कार्यक्रमात केले. ही मूळ संकल्पना त्यांची असून तरुणांमध्ये विलक्षण कल्पना शक्ती असते, त्यांनी त्याद्वारे वेगवेगळ्या माध्यमातून सुजाण नागरिकाचे कर्तव्य म्हणून, जागृकतेचे संदेश विविध प्रकारे लोकांपर्यंत पोहचवावे असे खुले आवाहन त्यांनी कार्यक्रमादरम्यान केले.